शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:02 IST

Maharashtra Assembly Election 2024: २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यामधून मार्ग काढून सरकार स्थापन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला शरद पवार हेही उपस्थित होते, असा दावा अजित पवार यांनी केला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकमेकांबाबत अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. दरम्यान, २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यामधून मार्ग काढून सरकार स्थापन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला शरद पवार हेही उपस्थित होते, असा दावा अजित पवार यांनी केला होता, अजितदादांच्या या दाव्यामुळे मोठा गहजब झाला होता. तसेच शरद पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होता. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्या बैठकीबाबत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सांगितले की, ही बैठक झाली होती, ते ठिकाण महत्त्वाचं होतं. गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली होती. गौतम अदानी यांनी मेजवानी दिली होती. मात्र त्यांनी राजकीय चर्चेत सहभाग घेतला नव्हता. मी स्वत: तिथे होतो. अमित शाह आणि अजित पवार हेही तिथे होते. तिथे सरकार स्थापन करण्यासाठी सत्ता वाटपाबाबत चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनी सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार केवळ ८० तासच चाललं.  

दरम्यान, या बैठकीबाबत मोठा गौप्यस्फोट करताना अजित पवार म्हणाले होते की, ५ वर्षापूर्वी काय घडले, कुठे बैठक झाली, त्यात कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. अमित शाह होते, गौतम अदानी होते, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस मी स्वत: आणि शरद पवारसाहेबही बैठकीत होते. मात्र या बैठकीतील गौतम अदानी यांच्या सहभागाबाबत अजित पवार यांनी यूटर्न घेत त्या बैठकीत अदानी यांचा राजकीय सहभाग नव्हता, अशी सारवासारव केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारGautam Adaniगौतम अदानीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी