शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 06:44 IST

Maharashtra Assembly Election 2024 : ‘आम्ही आधी दहा वर्षे वाट पाहिली, आता पुन्हा पाच वर्षे वाटच पाहायची का’, असा  प्रश्न बंडखोरांकडून नेत्यांना केला जात आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : राज्यात महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरांचे पीक आले असून, त्यांना समजावता समजावता ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडाला फेस आल्याची स्थिती आहे. निवडणूक लढण्याबाबत अतिशय गंभीर असलेले बंडखोर कोणाचेही ऐकत नसल्याचे चित्र बुधवारी दिवसभर बघायला मिळाले.

भाजपच्या उमेदवाराविरुद्ध ज्या भाजपजनांनी बंडखोरी केली आहे असे आणि मित्रपक्षांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अशा दोन्हींसाठी ‘ऑपरेशन समजूत’ राबविली जात आहे. ४ नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दिवाळी असूनही बंडखोरांची मनधरणी करण्यातच महायुतीच्या नेत्यांचा कस लागेल, असे चित्र आहे. 

भाजपसाठी चिंतेची बाब अशी की, संघ परिवार आणि भाजपमध्ये वर्षानुवर्षे सक्रिय असलेल्या नेत्यांनीच भाजपच्या वा महायुतीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. त्यामुळे महायुतीचे किमान ३५ उमेदवार हे अडचणीत सापडले आहेत. भाजपच्या मतदारसंघांमध्ये शिंदेसेना वा अजित पवार गटाचे बंडखोर उभे ठाकले आहेत. त्यांना शांत करण्यासाठी कुठे विधान परिषदेचा, तर कुठे पक्षसंघटनेत मोठे पद देण्याचा शब्द दिला जात आहे. ‘आम्ही आधी दहा वर्षे वाट पाहिली, आता पुन्हा पाच वर्षे वाटच पाहायची का’, असा  प्रश्न बंडखोरांकडून नेत्यांना केला जात आहे. 

...अशी आहे रणनीतीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि बंडखोरांच्या माघारीसाठी काय करायचे याबाबत रणनीती ठरविली. महायुतीतील बंडखोरी शमविण्याबरोबरच महाविकास आघाडीतील बंडखोर मैदानात कायम राहावेत यासाठीही वरून प्रयत्न सुरू आहेत.  भाजपमधील बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी स्वत: फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे हे दिवसभर फोनाफोनी करत होते. दोघेही मुंबईत होते, काही जणांना त्यांनी मुंबईत बोलावून समजाविण्याचा प्रयत्न केला. या दोघांव्यतिरिक्त बंडोबांना थंडोबा करण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती