शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ सर्व्हे काँग्रेसचा नाही, मविआला महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील, नाना पटोलेंचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 15:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: काल काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असल्याचा दावा करत एक सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेमधून राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, तसेच काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असा दावा करत प्रसिद्ध करण्यात आलेला हा सर्व्हे काँग्रेसने केलेलाच नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे प्रसारमाध्यमांमधून वेगवेगळ्या संस्थांचे सर्व्हेही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दरम्यान, काल काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असल्याचा दावा करत एक सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेमधून राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, तसेच काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असा दावा करत प्रसिद्ध करण्यात आलेला हा सर्व्हे काँग्रेसने केलेलाच नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावाही नाना पटोले यांनी केला. 

माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या काँग्रेसच्या सर्व्हेबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, हा सर्व्हे काँग्रेसचा नाही आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांमधून चुकीची माहिती प्रसारित होत आहे. प्रत्यक्ष जमिनीवर काय वातावरण आहे, याचा अंदाज आम्हाला आहे. लोकसभा निवडणुकी वेळीही आम्ही तसा अंदाज सांगत होतो. आता विधानसभा निवडणुकीवेळीही राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये २०० च्या वर जागांवर विजयी होईल. असा आम्हाला विश्वास आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने केलेला अंतर्गत सर्व्हे म्हणून काल एक सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेमध्ये राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ५५  ते ६० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला ३० ते ३५ जागा मिळतील, असेही या सर्व्हेमध्ये म्हटले होते.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी