शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 10:04 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष खबरदारी घेतली असून, पक्षाला यशाची सर्वाधिक खात्री असलेल्या विदर्भातील आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी विशेष विमानाची सोय काँग्रेसकडून करण्यात आल्याचं वृत्त आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निकालानंतरच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एक्झिट पोलमधून काहीही अंदाज व्यक्त झाले असले तरी प्रत्येक पक्षाला आपणच सत्तेत येऊ, असा विश्वास आहे. दरम्यान, निकालांनंतर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष खबरदारी घेतली असून, पक्षाला यशाची सर्वाधिक खात्री असलेल्या विदर्भातील आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी विशेष विमानाची सोय काँग्रेसकडून करण्यात आल्याचं वृत्त आहे.

विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून अटीतटीच्या लढतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर फोडाफोडीचे खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला आहे. तसेच विजय मिळण्याची खात्री असलेल्या विदर्भाती आपल्या संभाव्य उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.

काँग्रेसच विदर्भातील बहुतांश जागांवर निवडणूक लढवत असून, येथील जवळपास ३५ जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपा अशा लढती होत आहेत. त्यापैकी अनेक जागांवर विजय मिळेल, अशी खात्री काँग्रेसच्या नेत्यांना आहे. तसेच सत्ता स्थापनेतही आपल्या पक्षाची प्रमुख भूमिका राहील, याची जाणीव असल्याने काँग्रेसकडून प्रत्येक पाऊल सावधपणे उचलण्यात येत आहे.

दरम्यान, मतदानासाठी जनतेचा दांडगा उत्साह दिसून आला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल आणि काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. २५ नोव्हेंबरला आघाडीचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidarbhaविदर्भ