शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:39 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटत आला तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटत आला तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्यास उशीर का होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महायुतीने अद्याप विधिमंडळाच्या नेत्याचीही निवड केलेली नाही.  मुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचं हे निश्चित होत नसल्याने नव्या सरकारचा शपथविधी होत नसल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपालाच मुख्यमंत्रिपद मिळेल आणि मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन तसे संकेत दिले होते.

मात्र तरीही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा असली तरी भाजपाने अद्याप आपल्या विधानसभा सदस्यांच्या दलाचा नेता का निवडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आणि पक्षाच्या निरीक्षकांबाबतही काही घोषणा झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शनिवार आणि रविवारी अमावस्या आहे. त्या दिवशी शुभकार्य केलं जात नाही. त्यामुळे त्या दिवशी भाजपाच्या आमदारांची बैठक होण्याची शक्यता कमी आहे. रविवारी दुपारपर्यंत अमावस्या आहे. त्यामुळे त्यानंतर आमदारांचा बैठक होऊन पुढच्या काही दिवसांत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदाचा वाद सुटला असला तरी महायुतीमध्ये मंत्रिमंडळातील जागावाटप आणि खातेवाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. भाजपाला मुख्यमंत्रिपदासह किमान २० मंत्रिपदं हवी आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १० ते १२ मंत्रिपदं हवी आहेत. अजित पवार गटालाही ८ ते १० मंत्रिपदं हवी आहेत. त्याबरोबरच वित्तमंत्रालयावर अजित पवार गटाचा डोळा आहे. दरम्यान, अमावस्या संपल्यानंतर महायुतीचे नेते पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तसेच तिथे अमित शाह यांच्यासोबत पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार