शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

36 तासांत जाहिरात प्रसिद्ध करा, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 07:21 IST

Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ‘घड्याळ’ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात ३६ तासांत प्रकाशित करावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

 नवी दिल्ली  - उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ‘घड्याळ’ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात ३६ तासांत प्रकाशित करावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला न्यायालयात नाहक वेळ घालविण्यापेक्षा महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचा सल्ला दिला. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता व उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर शरद पवार यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. 

...म्हणून आम्हाला पुन: पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात यावे लागतेन्यायालयाने १९ मार्च आणि ४ एप्रिल रोजीच्या निकालातच अजित पवार गटाला याबाबतचे निर्देश दिले होते. शिवाय अजित पवार गटानेसुद्धा न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून जाहिरात प्रसिद्ध करण्याची हमी दिली होती. परंतु या आदेशाचे पालन होत नसल्याचे शरद पवार गटाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अजित पवार गटाने २४ तासांच्या आत फार-फार तर ३६ तासांत जाहिरात प्रकाशित करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. शरद पवार गटाचे वकील डॉ. अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे आम्हाला पुन: पुन्हा यावे लागत असल्याचे सांगितले.

घड्याळ न्यायप्रविष्टन्यायालयाने अजित पवार गटाला ३६ तासांत मराठीसह राज्यातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेत.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय