शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 20:05 IST

Maharashtra Assembly election 2024: एक मतदारसंघ आणि अनेक इच्छुक अशा परिस्थितीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी सुरू झाली आहे.

Maharashtra Assembly election 2024 Vidarbha: महायुती आणि महाविकास आघाडीचे नागपूर ग्रामीणमधील सहाही मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झालेले नाही. मात्र काटोल आणि उमरेड मतदारसंघात या दोन्ही आघाड्यांत नाराजांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. 

याज्ञवल्क्य जिचकर यांची निवडणुकीत उडी

काटोलमध्ये माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटत युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस याज्ञवल्क्य जिचकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. इकडे उमरेडमध्ये भाजपमधून इच्छुक असलेले प्रमोद घरडे आणि त्यांच्या पत्नी रूपाली घरडे या दाम्पत्याने उमेदवारी अर्ज दाखल करीत राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला.

महायुतीत बंडखोरी

दोघांनीही भाजप आणि अपक्ष असे प्रत्येकी दोन अर्ज सादर केले आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) विलास झोडापे यांनी सुद्धा अपक्ष अर्ज सादर केला. त्यामुळे उमरेडमध्ये महायुतीतही बंडखोरी होण्याचे संकेत आहे. 

याशिवाय उमरेडमध्ये संदीप कांबळे, प्रमोद बावनगडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काटोलमध्ये जिचकर यांनी समर्थकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती येथून रॅली काढत तहसील कार्यालयात दाखल झाले. 

यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष चिवंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत त्यांच्या आई राजश्री श्रीकांत जिचकार, मैत्री जिचकार, सुरेंद्र जिचकार आदी उपस्थित होते. कामठीत जय विदर्भ पार्टीचे प्रशांत अनिल नखाते यांनीही अर्ज दाखल केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४katol-acकाटोलumred-acउमरेडMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी