शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:04 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

भूम : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी (दि.१८) संध्याकाळी सहा वाजता होईल. त्यासोबतच गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भूममध्ये सभा घेतली होती. यावेळी मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

भूम शहरामध्ये रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर यांनी सभा घेतली. या सभेत महादेव जानकर म्हणाले, "मी मुख्यमंत्री होणार नाही. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री मी कधीच होणार नाही. आईची शपथ घेऊन सांगतो. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्यावर भूम-परंडातून हेलिकॉप्टर घेऊन फिरेन".

या सभेत महादेव जानकर यांनी भाजपवरही हल्लाबोल केला.भाजप चालू पार्टी आहे. माणसात माणूस आणि पक्षात पक्ष ठेवत नाही. शरद पवारांचे घर फोडलं तर बाळासाहेबांचे चिन्ह चोरलं, असा शब्दांत महादेव जानकर यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावतील. मात्र, त्यापूर्वी आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांचे नेते पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. 

परंड्यात ५२ टक्के गृहभेट मतदान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार, ८५ वर्षे वयावरील मतदार व दिव्यांग मतदारांचे गृहभेट मतदान सुरू करण्यात आले आहे. शनिवारी परंडा मतदारसंघात ही प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण नोंदणी केलेल्या मतदारांच्या तुलनेत ५२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.रविवारीही ही गृहभेट मतदानाची प्रकिया सुरु होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahadev Jankarमहादेव जानकरparanda-acपरांडा