शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 08:28 IST

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वीच निवडणूक रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. 

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा म्हणजेच ४ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता. बंडखोर उमेदवारांच्या माघारीचा हा दिवस कोल्हापुरात अधिकृत उमेदवाराच्या माघारीने गाजला. काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वीच निवडणूक रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. 

मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, काँग्रेसने आपली उमेदवारी पुरस्कृत करावी, अशी मागणी राजेश लाटकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत सतेज पाटील यांनी  आपण आज, मंगळवारी निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँगेस राजेश लाटकर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

सतेज पाटील यांची तीव्र नाराजीमधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली."दम नव्हता, तर निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण माझी ताकद दाखविली असती", अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या माणिक मंडलिक यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. मधुरिमांच्या अनपेक्षित माघारीमुळे काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तरमध्ये असणार नाही. त्यामुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस गायब झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय महाडिक यांनी लगावला आहे. 

लाटकरांचे तिकीट कापून मधुरिमाराजेंना संधीकोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून काँग्रेसने आधी राजेश लाटकर यांना तिकीट दिले होते. मात्र काही नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला.तसेच, यासंबंधीचे पत्र या नगरसेवकांनी  काँग्रेस नेते सतेज पाटील यांना दिले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना तिकीट दिले. मात्र, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता सतेत पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील