शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:49 IST

Maharashtra Assembly Election 2024: प्रचारसभेसाठी जात असताना बॅगांची तपासणी करण्यात आल्याने उद्धव ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्याचं प्रकरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. या प्रकारावरून उद्धव ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसेच निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची तपासणी होणं ही सामान्य बाब असल्याचे सांगत भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडील बॅगेचीही तपासणी झाली असल्याचा व्हिडीओ समोर आणला आहे. 

भाजपा महाराष्ट्रकडून यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडील बॅगांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्याचंही दिसत आहे. यावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना भाजपाने म्हटलंय की,  ‘’जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा  व्हिडीओ पाहा, ७ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडीओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावरसुद्धा  देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली होती, असं सांगत महाराष्ट्र भाजपाकडून त्या तपासणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असा टोलाही भाजपाने या पोस्टमधून लगावला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग