शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या क्षणी जाहीर केले पाच उमेदवार, शरद पवार गटाने बदलला मोहोळमधील उमेदवार; पंढरपुरातही उमेदवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 09:13 IST

Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील उमेदवार बदलून शिंदेसेनेतून आलेल्या राजू खरे यांना शरद पवार गटाने  उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी शरद पवार गटाने ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. आतापर्यंत जाहीर केलेल्या एकूण उमेदवारांची संख्या ८७ इतकी झाली आहे. या आधी पक्षाने पहिल्या यादीत ४५ , दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत ९ तर चौथ्या यादीत ७ उमेदवार जाहीर केले होते.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील उमेदवार बदलून शिंदेसेनेतून आलेल्या राजू खरे यांना शरद पवार गटाने  उमेदवारी दिली आहे. माढा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. माढ्यामधून शरद पवार गटाकडून लढण्यासाठी पाटील यांच्यासह माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील, विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, पुतणे धनराज शिंदे, हे देखील इच्छुक होते. मात्र शरद पवारांनी इथून अभिजित पाटील यांना संधी दिली. तसेच मोर्शीमधून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत तर मुलुंडमधून संगिता वाजे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार माढा : अभिजीत पाटील (नवीन चेहरा)मुलुंड : संगिता वाजे (नवीन चेहरा)मोर्शी : गिरीश कराळे (नवीन चेहरा)पंढरपूर : अनिल सावंत (नवीन चेहरा)मोहोळ : राजू खरे (नवीन चेहरा)

पंढरपूरच्या जागेवरून मविआत वादाची शक्यता पंढरपूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या आधीच काँग्रेसकडून येथे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पंढरपूरची जागा नेमकी कोणाची? यावरून मविआत वाद होण्याची शक्यता आहे.

ऐनवेळी पत्ता कट  मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर इथे उमेदवार बदलण्यात आला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेस