शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:38 IST

चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

चंद्रपूर - मागील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा उमेदवाराचा दारूण पराभव करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर भाजपात प्रवेश करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरगेवार यांच्याबाबतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. किशोर जोरगेवार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, परंतु त्याला स्थानिक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. त्यानंतर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोळंबला. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत. 

किशोर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील प्रवेश खोळंबल्यानंतर ते भाजपात पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्याला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला. मुनगंटीवारांनी त्यांची नाराजी थेट दिल्लीत व्यक्त केली. त्यामुळे किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर केली असून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा आहे. 

उद्या सकाळी ११ वाजता अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपा पक्षप्रवेश चंद्रपूरात पार पडणार आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार उपस्थित असणार आहे. भाजपा नेतृत्वाकडून किशोर जोरगेवारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने मुनगंटीवारांचा विरोध मावळल्याचं समोर आले. किशोर जोरगेवार हे चंद्रपूरातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.  किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामागे माजी खासदार हंसराज अहिर यांचे पाठबळ लाभले त्यामुळे जोरगेवारांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. ज्यांनी किशोर जोरगेवारांना विरोध केला त्यांच्या उपस्थितीत किशोर जोरगेवार भाजपात पक्षप्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

चंद्रपूरातील राजकीय परिस्थितीवर जोरगेवार काय म्हणाले होते?

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले होते की, २०१९ मध्ये काँग्रेसने माझा प्रवेश करून घेतला. मला एबी फॉर्म दिला, त्यानंतर ऐनवेळी उमेदवारी दुसऱ्याला दिली. निकालात काँग्रेस उमेदवाराला १४ हजार मते मिळाली, तर मला काँग्रेस उमेदवारापेक्षा १ लाख ३ हजार मते जास्त मिळाली. देशात सर्वाधिक ७३ हजारांच्या मताधिक्याने अपक्ष म्हणून मी निवडून आलो. तीच स्थिती भाजपाची झाली. भाजपाचा उमेदवार ४४ हजार मतांवर थांबला. गेल्या ७५ वर्षात देशात अपक्षांच्या इतिहासात मी ७३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेला पहिला अपक्ष आमदार आहे असं त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस