शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
6
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
7
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
8
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
9
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
10
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
11
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
12
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
13
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
15
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
16
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
17
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
18
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
19
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
20
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:14 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत एका तरूणाने अपशब्द बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. 

मुंबई - साकीनाका येथील सभा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना त्यांचा ताफा संतोष कटके नावाच्या तरुणानं अडवला. काळे झेंडे दाखवून या तरुणाने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले. त्याने मुख्यमंत्र्‍यांच्या कार फटकाही मारला. या प्रकारामुळे संतप्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला आणि स्वत: गाडीतून खाली उतरले. महाविकास आघाडीचे उमेदवार नसिम खान यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

या प्रकारामुळे एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते. त्यांनी कारमधून खाली उतरत महाविकास आघाडीच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना जाब विचारला. कार्यकर्त्यांना तुम्ही असंच शिकवता का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. या प्रकारातील संतोष कटके नावाच्या तरुणाला मुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कटके कुटुंबियांसह मविआ कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला.  मुख्यमंत्र्‍यांना काळे झेंडे दाखवणारा तरुण आज ठाकरे गटात 

साकीनाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणारा तरूण आणि त्याच्या वडिलांनी आज मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला आहे. संतोष कटके आणि त्याचे वडील साधू कटके यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. साधू कटके हे आठवले गटाचे पदाधिकारी होते. मुख्यमंत्र्‍यांना काळे झेंडे आणि अपशब्द बोलल्याचा आरोप असणाऱ्या या तरुणाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहिल्यानंतर माझ्यातील कडवट शिवसैनिक जागरुक झाला आणि मी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी मला ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले असं या तरूणाने म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही या तरुणाने मुख्यंमंत्री शिंदेंविरोधात अपशब्द वापरले. मात्र या प्रकारामुळे आगामी काळात शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये अधिक संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे