शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"मोदी आणि शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:09 IST

Maharashtra Assembly Election 2024: नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे. 

विधानसभा निडणुकीच्या प्रचारासाठी वणी येथे गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतप्त झाल्याचे दिसत होते. दरम्यान, सोमवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी या घटनेवरून निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. 

वणी येथे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर सोबत आणलेल्या बॅगांची तपासणी केल्याने संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, यांच्या बॅगा इकडे येताना तर तपासाच, पण महाराष्ट्रातून जाताना जास्त तपासा, कारण महाराष्ट्र लुटून ते गुजरातला नेत आहेत. त्यामुळे जाताना त्यांची बॅग तपासा. अगदी खिसे, पाकीट सगळं तपासा. काय चाललंय काय? तुम्ही हम करे सो कायदा आणि आम्ही काय गांडूळ बनून, असेच बसलोय का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, सोमवारी उद्धव ठाकरे यांची वणी येथे सभा झाली. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले होते, यावेळी हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांना तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. तसेच अधिकाऱ्यांचा झाडाझडती घेत तुम्ही कधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्या बॅगा तपासल्या का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग