शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 17:04 IST

महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचही टेन्शन वाढवणारा!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.  20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील सी व्होटर्सचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार 51 टक्के लोकांनी असे भाष्य केले आहे, जे महायुती सरकारच्या हृदयाचे ठोके वाढवतील. तर, जाणून घेऊयात, महाराष्ट्रात कुणाची आहे हवा आणि कुणाचे पारडे आहे जड...?

या सर्व्हेमध्ये, सध्याच्या भाजप-शिंदे सरकारवर आपण नाराज आहात का आणि हे बदलण्याची आपली इच्छा आहे का? या प्रश्नावर 51.3 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या मनात राग आहे आणि हे सरकार बदलण्याची आमची इच्छा आहे. तसेच 3.7 टक्के लोकांनी म्हटले आहे की, आमच्या मनात राग आहे, मात्र हे सरकार बदलण्याची इच्छा नाही. 41.0 टक्के लोकांनी सांगितले की ते रागावलेले नाही आणि बदलण्याची त्यांची इच्छा नाही. अर्थात 41 टक्के लोकांना पुन्हा भाजप-शिंदे सरकार हवे आहे. तसेच 4% लोक म्हणाले, सध्या काहीही सांगू शकत नाही. महत्वाचे म्हणजे, 51 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये या सरकारसंदर्भात राग आहे आणि त्यांना हे बदलायचे आहे. 

मुख्यमंत्री पदासाठी जनतेची पसंती -  यावेळी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांची पसंती कुणाला, असा प्रश्न विचारला असता, 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे, असे उत्तर दिले. 22. 9 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. तर 10.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली. याशिवाय, 5.9 टक्के लोकांनी शरद पवार तर 3.1 %  लोकांनी अजित पवारांना पसंती दिली.

भाजप-शिवसेना सरकारची कामगीरी कशी वाटते? यावर 52.5 टक्के लोकांनी चांगली, असे उत्तर दिले. तर 21.5 टक्के लोकांनी सरासरी तर 23.2 टक्के लोकांनी खराब असे उत्तर दिले.

निवडणुकीत कोणते घठक प्रभावी ठरतील?- असा प्रश्न विचारला असता 23.0 टक्के लोकांनी मराठा आरक्षण असे सांगितले, 12. 2 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी महत्वाची ठरेल असे सांगितले. 9.8 टक्के लोकांनी स्लम पुनर्विकासाचा मुद्दा सांगितला. 7 टक्के लोकांनी सरकारची कामगिरी आणि योजनांवर भाष्य केले. 8.2 टक्के लोकांनी सरकारी रुग्णालयाची स्थिती, 6 %  लोकांनी राज्याची आर्थिक स्थिती तर आणि 2.5 टक्के लोकांनी एनसीपीमधील फूट मोठा फॅक्टर असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेना