शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 06:54 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मित्रपक्षांना भाजपने ४, शिंदेसेनेेने २ दिल्या जागा

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २५, शिंदेसेनेने १५ तर काँग्रेसने ४ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. भाजपने आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर करीत ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. यासह भाजप आतापर्यंत १५० जागांवर पोहोचला आहे. तर काँग्रेसही १०२ जागांवर पोहोचला आहे. मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने आजच्या यादीसह एकूण ८० उमेदवार रिंगणात उतरविले असून त्यात काही भाजप नेत्यांनाही संधी दिली आहे. 

भाजपने दादाराव केचे (आर्वी), विकास कुंभारे (मध्य नागपूर), डॉ. संदीप धुर्वे (आर्णी), नामदेव ससाणे (उमरखेड) व सुनील राणे (बोरिवली) यांचे तिकीट कापले. मात्र, हरीश पिंपळे (मूर्तिजापूर), भारती लव्हेकर (वर्सोवा), पराग शाह (घाटकोपर पूर्व), राम सातपुते (माळशिरस) यांना पुन्हा संधी दिली. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि काँग्रेसमधून आलेले माजी आमदार जितेश अंतापूरकर (देगलूर) यांनाही उमेदवारी दिली.रा. स्व. संघाचे मुख्यालय ज्या मध्य नागपूर मतदारसंघात येते तेथील विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी नाकारली. तेथे माजी महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली. 

भाजपने आतापर्यंत राज्यात १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात ९३ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. वसईमधून उमेदवारी मिळालेल्या स्नेहा दुबे या माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या कन्या आहेत. 

फडणवीसांचे दुसरे पीए रिंगणातदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार हे २०१९ मध्ये औसामधून लढले आणि जिंकले होते. आता फडणवीस यांचे सहा महिने पूर्वीपर्यंत पीए असलेले सुमित वानखेडे यांना आर्वीतून (जि.वर्धा) उमेदवारी देण्यात आली आहे. आर्वीमध्ये शरद पवार गटाने वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी दिली आहे.

...या चार जागा मित्रपक्षांनाभाजपने बडनेराची जागा युवा स्वाभिमानीला, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना; मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य पार्टीला सोडली आहे. बडनेरामध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे, तर शाहुवाडीत विनय कोरे हे उमेदवार असतील.लोकसभेपूर्वी काँग्रेस सोडली, आता ‘भाजप’चे उमेदवार : माजी आमदार दिवंगत रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जितेश काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढले आणि जिंकले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश केला. ‘भाजप’ने त्यांना देगलूरमध्ये उमेदवारी दिली.

लातूरमध्ये चाकूरकर-देशमुख सामना : लातूर शहरमध्ये भाजप उमेदवार अर्चना पाटील-चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या सून आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे अमित देशमुख यांच्याशी होईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूक