शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 21:27 IST

विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर प्रभावी ठरला नसल्याचे समोर आलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती फिरताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरंगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम महायुतीने लोकसभेला पाहिले होते. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव पडला होता. त्यामुळे आता मराठा आंदोलनाचा हाच परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. १० पैकी ६ एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर प्रभावी ठरला नसल्याचे समोर आलं आहे.

विविध एक्झिट पोलने महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर लोकशाही महारुद्रच्या सर्वेक्षणात राज्यात कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार नसून सत्तेची चावी अपक्ष किंवा बंडखोरांच्या हाती असेल, असा अंदाज आहे. प्रत्यक्षात काय होणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे म्हणत मराठा आरक्षणाचा विचार करूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी मराठा मतदारांना केले होते.

अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार ४८ टक्के मराठा समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. तर ४० टक्के मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ६४ टक्के ओबीसी समाजानेही महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर २५ टक्के ओबीसी समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे.

अनुसूचित जातीच्या ३४ आणि अनुसूचित जमातीच्या ४९ टक्के समाजाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर महाविकास आघाडीला अनुसूचित जाती आणि जमातीच्या समाजाने अनुक्रमे ४० आणि ३७ टक्के पाठिंबा दिला आहे. ५३ टक्के कुणबी समाज हा महायुतीच्या पाठी मागे आहे. तर ३४ टक्के कुणबी समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे. तर ७९ टक्के मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे. तर ४ टक्केच मुस्लिम समाजाने भाजप पुरस्कृत महायुतीला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, कोकण आणि ठाणे पट्टयातील ३९ जागांपैकी महायुतीला २४ तर मविआला १३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना २ जागा दाखविण्यात आल्या आहेत. या भागात मविआला मोठा धक्का बसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा गड आहे. तिथे महायुतीला ५० टक्के आणि मविआला ३३ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर मनसेसह इतरांना १५ टक्के मतदान दिसत आहे. मराठवाड्यात ४६ पैकी महायुतीला ३०, मविआला १५ आणि इतर १ अशा जागा मिळतानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात ४७ जागांपैकी महायुतीला ३८, मविआला ७ आणि इतरांना २ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathaमराठाMahayutiमहायुतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील