शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:51 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल, फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी असं लोकांना वाटतं, असा दावा  संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता शिवसेना शिंदे गटाने संजय राऊत यांना टोला लगावला आहे.  

महाविकास आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्या आलं असताना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागांबाबत मोठं विधान केलं होतं. शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल, फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी असं लोकांना वाटतं, असा दावा  संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता शिवसेना शिंदे गटाने संजय राऊत यांना टोला लगावला आहे.  सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी आधी लढवा, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की, सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा. कसली सेंच्युरी मारताय. प्रसारमाध्यमांतून ज्या बातम्या येताहेत त्यानुसार यांना ९५ जागा मिळणार आहेत आणि सेंच्युरी १०० ला म्हणतात, हे तरी त्यांना समजलं पाहिजे. की ९५ जागा लढून ९५ जागा जिंकणार आहेत. हा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. या सगळ्यांची मिळून सेंच्युरी झाली. तरी ती १००ची होते. बाकी १८८ जागांवर आम्ही आहोत, याचं भान त्यांनी राखलं पाहिजे. म्हणून येणारी सत्ता ही महायुतीचीच असणार आहे, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.

शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल. तसेच शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी लोकांची अपेक्षा आहे. फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी, असं लोकांना वाटतं. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे. मराठी माणसाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. त्यामुळे शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी ११ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असं विधान  संजय राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत जी माहिती समोर येत आहे. त्यानुसास शिवसेना ठाकरे गटाला ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १०५ आणि शरद पवार गट हा ८५ जागांवर लढणार असल्याचा दावा केला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती