शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:20 IST

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे.

Ashok Chavan on Batenge Toh Katenge : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून या घोषणेचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महायुतीच्या नेत्यांपर्यंत सर्वच जण अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. असं असताना दुसरीकडे महायुतीचे काही नेते या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आता माजी मुख्यमंत्री आणि काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनीही ही घोषणा विनाकारण देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही, असे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

"मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपमध्ये असलो तरीही मी सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वावपासून वेगळं केलेलं नाही. पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगतं. भाजपमध्ये ही विचारधारा आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपमध्ये सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत," असंही अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, याआधी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटलं आहे. "आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून मी त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की विकास हाच खरा मुद्दा आहे. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत. विविध राजकीय परिस्थिती असलेल्या यूपीच्या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस