शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:26 IST

महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यात विविध घटक पक्षांच्या मागणीचा समावेश करण्यात आला आहे. 

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व मतदारसंघातील मविआचे समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुस्लीम आरक्षणासह लव्ह जिहाद समितीची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व मुस्लिम बांधवांसाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले जावे अशी मागणीही या पत्राद्वारे समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडूनमुस्लीम मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मुस्लिमांसाठी राखीव बजेट ठेवण्याची मागणी होत आहे. समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षण, १० हजार कोटींचे मुस्लिमांसाठी बजेट ठेवण्याची मागणी करून समाजवादी पक्षाने या मतदारांना मविआकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

महाराष्ट्रात एकूण ३८ मतदारसंघात मुस्लीम मतदारांची निर्णायक संख्या आहेत. राज्यातील एकूण २८८ पैकी ९ मतदारसंघात जवळपास ४० टक्के मुस्लीम, ३८ मतदारसंघात २० टक्क्याहून अधिक मुस्लीम, भिवंडी मतदारसंघात ५० टक्क्याहून अधिक मुस्लीम आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 

दरम्यान, जर मुस्लिमांना आरक्षण नसेल तर त्यांना मिळायला हवं. समाजवादी पक्ष ही मागणी सातत्याने करते. सत्ता मिळाल्यावर आम्ही ही तरतूद करू. या देशात मंदिरासाठी बजेट असेल, एखाद्याला जिल्ह्यासाठी बजेट असू शकते. रामनवमीसाठी सरकार वेगळे बजेट ठेवते. दुर्गा जागरणासाठी बजेट ठेवते. सरकार धार्मिक कार्यक्रमांसाठी बजेट ठेवू शकते मग आम्ही माणसांसाठी बोलतोय. त्यात गैर काय...या देशातील अल्पसंख्याकही कर भरतो. ते जर स्वत:साठी मागत असतील तर चुकीचे नाही असं विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज यादव यांनी केले आहे.

मविआच्या जाहीरनाम्यात असणार समावेश? सर्वांचे आपापले विषय, मागणी, शिफारसी, सूचना असतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मागील १ महिन्यापासून जाहीरनामा तयार करण्यासाठी काम सुरू केले आहे. पृथ्वीराज चव्हाण या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. त्यात समाजवादी पक्षाची शिफारस घेतली गेली. त्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याही शिफारशी घेतल्या गेल्यात असं विधान काँग्रेस नेते नसीन खान यांनी केले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhiwandi-east-acभिवंडी पूर्वmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMuslimमुस्लीमMahavikas Aghadiमहाविकास आघाडी