"राज्यावर आठ हजार कोटींचं कर्ज, तरीही पुरवणी मागण्यांच्या माध्यामातून तिजोरीवर डल्ला’’, अंबादास दानवेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:41 IST2025-03-07T13:38:21+5:302025-03-07T13:41:13+5:30
Maharashtra Assembly Budget Session: राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजीरोवर डल्ला मारण्याच काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

"राज्यावर आठ हजार कोटींचं कर्ज, तरीही पुरवणी मागण्यांच्या माध्यामातून तिजोरीवर डल्ला’’, अंबादास दानवेंचा आरोप
मुंबई - राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजीरोवर डल्ला मारण्याच काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यावरील आपल्या भाषणावेळी अंबादास दानवे यांना हा आरोप केला.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, सरकार मोठं मोठया घोषणा करतं मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाही. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर करायची असल्यास लोकप्रिय योजनांच्या मागे सरकारने जाऊ नये, असा सल्लाही अंबादास दानवे यांनी यावेळी दिला. तसेच सरकारने निधी वाटपात केलेली असमानता, रखडलेले प्रकल्प याबाबत मुद्दे मांडत दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर टीकेची झोड उठवली.
राज्य सरकारने ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यातील २ हजार १३३ कोटी रुपयांची रक्कम ही केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत असलेल्या योजनांसाठी मागण्यात आली आहे, असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
पंतप्रधानांच स्वप्नं असलेलं स्किल इंडिया म्हणजेच कौशल्य विभागाच्या योजना या आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. जलसंपदा विभागामध्ये २७ हजार कोटी रुपये असताना त्यातून १४ हजार कोटी रुपये सुद्धा खर्च झाले नाहीत.
जीवन मिशनच्या जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण अंतर्गत 945 योजना प्रस्तावित असताना त्यासाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता असताना 29 हजार कोटी रुपयांची मागणी असूनही कमी निधीची तरतूद करण्यात आली. सरकारने सरपंचांचे मानधन दुपटीने करण्याची घोषणा केली मात्र त्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही. परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव धूळखात पडला आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी यावेळी केला.