शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेती लहरी हवामानाच्या ‘हॉटस्पॉट’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 20:02 IST

हवेचे प्रदूषण, भुजल पातळी खालावणे, मृदा संधारण आणि पीक फेरपालट न केल्यामुळे सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दुष्परिणांमध्ये महाराष्ट्र ‘हॉट स्पॉट’वर आहे. 

ठळक मुद्देभुजल पातळीच्या वाढीकरिता हवे योग्य व्यवस्थापन ड्ब्ल्यु टी ओ संस्थेकडून विविध निष्कर्ष तापमान आणि पर्जन्यमान्यातील बदलांचा सर्वाधिक धोका महाराष्ट्राने नोव्हेंबरमध्ये १३१ तालुक्यांमध्ये दुष्काळ केला जाहीर नागरिकांच्या आणि युवकांच्या मोहिमा, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार

पुणे : सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम मृदा संधारणावर होत आहे. केवळ पाण्याच्या संवर्धनाबरोबरच मृदा संधारणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाढते प्रदूषण त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. या सगळ्याचा परिणाम पिकांवर होत आहे. हवेचे प्रदूषण, भुजल पातळी खालावणे, मृदा संधारण आणि पीक फेरपालट न केल्यामुळे सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दुष्परिणांमध्ये महाराष्ट्र ‘हॉट स्पॉट’वर आहे.  वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या हवामान बदलांचा अभ्यास करुन शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे काम करणाऱ्या संस्थेने नुकतेच २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने मांडण्यात आलेल्या निष्कर्षांची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त क्रिस्पिनो लोबो, संचालक संदीप जाधव उपस्थित होते. जाधव म्हणाले, भारत हवामान बदलासाठी हॉटस्पॉट आहे. येथील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या निसर्गावर आधारित आहे. त्यामुळे याठिकाणी तापमान आणि पर्जन्यमान्यातील बदलांचा सर्वाधिक धोका संभवतो. फक्त पावसावर आधारित शेती करणाऱ्या भागात महाराष्ट्राच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक भाग व्यापलेला आहे. मात्र अशा ठिकाणी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राने नोव्हेंबरमध्ये १३१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला तर कर्नाटकने १०० पैकी ७२ तालुक्यांत दुष्काळाचा अहवाल दिला.  लोबो यांनी सांगितले, सध्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सुधारित जलवापर पध्दती, जल अंदाजपत्रक तयार करणे, पूर्णपणे सेंद्रिय किंवा मर्यादित स्वरुपातील रासायनिक खतांचा वापर, माती आरोग्याची तपासणी आणि जमीन निकृष्ट होण्यावर नियंत्रण करण्याकरिता समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. तसेच वातावरणातील बदलाच्या परिस्थितीत नवीन आव्हानाना सामोरे जाण्याकरिता विद्यमान विस्तार सेवांची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे. प्रगतीच्या महत्वाकांक्षा मर्यादित ठेवण्याकरिता अधिक विकसित राष्ट्रांमधुन नागरिकांच्या आणि युवकांच्या मोहिमा, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 

काय करावे लागेल? - लहान शेतकऱ्यांनी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याकरिता आणि शेती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समुह / गट शेती आणि शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. - स्थानिक परिस्थिती आणि वेळेनुसार विस्तृत कृषी हवामानविषयक सल्ल्यांचा प्रसार करणे व स्वयंचलित निर्णय समर्थन प्रणालीचा वापर करुन असे सल्ले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचिणे गरजेचे आहे.- पावसाचा लहरीपणा आणि भुगर्भातील उथळ जलाशयांमध्ये झिरपणारा मर्यादित पाणीसाठा अशा भागातील पाण्याचे स्त्रोत व्यवस्थापित करणे फार महत्वाचे आहे.  - वातावरणातील बदलांच्या आव्हानांना विशेषत: भुजल वापर, जमिनीचा वापर, जलसंसाधन, शेती आणि हवामान, वित्त क्षेत्र, यांना एकत्रित आणि परिणामकारक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीweatherहवामान