‘एआय’च्या विश्वात महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल; दीड लाख रोजगार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:57 IST2026-04-30T08:56:40+5:302026-04-30T08:57:07+5:30

मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर

Maharashtra ambitious step into the world of 'AI'; 1.5 lakh jobs created | ‘एआय’च्या विश्वात महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल; दीड लाख रोजगार निर्मिती

‘एआय’च्या विश्वात महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल; दीड लाख रोजगार निर्मिती

मुंबई : उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्यासाठी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र एआय धोरण-२०२६’ जाहीर करण्यात आले. ‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर हे धोरण राबवले जाईल. ‘नैतिक व सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचे राष्ट्रीय केंद्र’ ही ओळख निर्माण करण्यासाठी ‘महाराष्ट्र एआय मिशन’ स्थापन करण्यात येईल.  

पायाभूत सुविधा व विकास
एआय उत्कृष्टता केंद्रे : आरोग्य, शेती, शिक्षण, नागरी विकास, मराठी भाषा-संस्कृती आणि वित्त अशा ६ महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापणार. 
एआय इनोव्हेशन सिटीज : राज्यात ५ ‘एआय इनोव्हेशन सिटीज’ उभारणार. संगणकीय पायाभूत सुविधा : एआय रिसर्च आणि विकासाला गती देण्यासाठी २,००० जीपीयूची (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) तरतूद. 

नैतिक एआय आणि सुशासन
कायमस्वरूपी फ्रेमवर्क : एआयच्या नैतिक आणि सुरक्षित वापरासाठी एक नियमावली तयारकेली जाईल.
एआय रेडीनेस ऑडिट : प्रत्येक शासकीय विभागासाठी वार्षिक एआय सज्जता, ऑडिट बंधनकारक असणार आहे.

स्टार्ट-अप्स, ‘एमएसएमई’साठी पाठबळ 
स्टार्टअप फंड : एआय स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा स्वतंत्र ‘एआय स्टार्टअप व्हेंचर फंड’
युनिकॉर्नचे उद्दिष्ट : राज्यात किमान एक तरी एआय ‘युनिकॉर्न’ कंपनी तयार करणार.
महिला उद्योजकता : महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना १ कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान आणि २५% अतिरिक्त आर्थिक मदत. 
एमएसएमई सवलत : ५,००० लघू व मध्यम उद्योगांना एआय तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या खर्चावर २०% अनुदान. 

एआयमुळे सत्तर टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे, त्यामुळे या धोरणात काळानुरूप बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. 
 

Web Title : महाराष्ट्र की एआई नीति का लक्ष्य: 2026 तक 1.5 लाख नौकरियां

Web Summary : महाराष्ट्र ने एआई नीति का अनावरण किया, जिसका लक्ष्य 2026 तक 1.5 लाख नौकरियां पैदा करना है। योजना में एआई उत्कृष्टता केंद्र, नवाचार शहर, स्टार्टअप फंड और एमएसएमई के लिए समर्थन शामिल है। यह नैतिक एआई उपयोग और शासन पर केंद्रित है, जिसका लक्ष्य एआई-तैयार राज्य बनाना है।

Web Title : Maharashtra's AI Policy Aims for 1.5 Lakh Jobs by 2026

Web Summary : Maharashtra unveils its AI policy, targeting 1.5 lakh jobs by 2026. The plan includes establishing AI excellence centers, innovation cities, a startup fund, and support for MSMEs. It focuses on ethical AI use and governance, aiming for an AI-ready state.