शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सिनेमा, नाट्यगृहांसह मल्टिप्लेक्स आजपासून सुरू, सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 01:50 IST

Maharashtra allows cinema halls, multiplexes to reopen at 50% capacity from today : मार्चपासून कोरोनामळे केलेल्या  लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे चित्रपट, नाट्य व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला.

मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरची चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह पाच नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. राज्य शासनाने बुधवारी हा निर्णय घेतला. मार्चपासून कोरोनामळे केलेल्या  लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे चित्रपट, नाट्य व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला. मनोरंजन क्षेत्र खुले करण्याची मागणी सातत्याने होत असताना आता पुनश्च हरिओम होत आहे. ५ तारखेच्या मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही भेट दिली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे पदार्थ मात्र घेऊन जाता येणार नाहीत. 

क्रीडाप्रेमींसाठीही चांगली खबर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसाठी कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील स्विमिंग पूल ५ नोव्हेंबरपासून खुले करण्यात येतील. टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारख्या इनडोअर गेमनादेखील परवानगी देण्यात आली आहे. यावेळी  सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीची एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्यूटदेखील सुरू होत आहेत. 

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल चित्रपटगृहे बंद असल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले असून अनेक कलावंत, तंत्रज्ञ व या व्यवसायाशी संबंधित आर्थिक विवंचनेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने कालच्या (३ नोव्हेंबर) अंकात दिले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत सरकारने अखेर पडदा उघडण्यास परवानगी दिली आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस