शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:55 IST

महादेव जानकर यांनी आता काँग्रेससोबत जाण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Mahadev Jankar News:  भाजपाने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपाला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. राहुल गांधी यांनी पक्ष कार्यालयात बोलावले नाही, घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली. राहुल गांधी सोबत जनगणना बाबत चर्चा झाली. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात महायुतीत धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट चांगलेच नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात पुन्हा एकदा खटके उडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता महादेव जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीसोबत असलेले महादेव जानकर इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची महादेव जानकर यांनी भेट घेतली. या भेटीबाबत महादेव जानकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. 

तेजस्वी यादव, शरद पवारांना भेटणार

अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली. यापुढे स्टॅलिन, शरद पवार, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहे. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे, असे जानकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करू नये, असे जानकर म्हणाले.

दरम्यान, माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. मोठा पक्ष छोट्याला दाबतो, त्याचा अनुभव त्यांना येईल. आमच्यासाठी भाजपाने दार बंद केली आहे. आमची काही चूक नाही, अशी खंत जानकर यांनी बोलून दाखवली. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास अघाडीत असलेले महादेव जानकर महायुतीत आले होते. त्यानंतर महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. परंतु मविआचे उमदेवार संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांना सत्तेत काही स्थान मिळाले नाही.

 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरRahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुतीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी