Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:34 PM2021-08-01T18:34:23+5:302021-08-01T18:38:33+5:30

Taliye village Landslide: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच तळीये वासियांच्या भेटीला जाणार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी फोनवरून सांगितले आहे.

Mahad Landslide: 50 to 55 lives would have been saved in Taliye village; Serious allegations of locals in front of MNS leaders | Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप

Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप

Next

महाड/मुंबई: गेल्या महिन्यात कोकणात महापुराने कहर केला होता. महाडच्या तळीये गावात दरड (Taliye village Landslide) कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दरडीखाली 35 घरे दबली गेली. या दुर्घटनेत वेळीच मदत मिळाली असती तर 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. दुर्दैव म्हणजे तळीये गावापासून अवघ्या दोन किमी अंतरावर स्थानिक आमदारांचे घर आहे. तरीदेखील ते घटनास्थळी पहायलाही आले नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मनसेचे नेते गणेश चुक्कल तळीये गावात गेले आहेत. त्यांच्यासमोर स्थानिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. (MLA home at 2 KM distance, but they not came to help in Taliye Landslide victims: MNS)

तळीये दुर्घटनेत 80 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. गावावर जेव्हा दरड कोसळली त्यानंतर 22 तास कोणतीही मदत पोहोचली नाही. प्रशासनाने एक फोकलेन जरी दिला असता तरी माती उकरली असती आणि 50 ते 55 जणांना वाचवता आले असते, अशी व्यथा स्थानिकांनी गणेश चुक्कल यांच्यासमोर मांडली.

या दुर्घटनाग्रस्तांकडे शासनाची कुठलीही मदत पोहचली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गणेश चुक्कल यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना फोन करून स्थानिकांसोबत त्यांचा संपर्क करून दिला. ६ महिन्याचं बाळ गमावलेल्या वडिलांनी राज ठाकरेंकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आमचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं अशी विनंती फोनवरुन केली. त्यावर शर्मिला ठाकरेंनी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच राज ठाकरे आपल्याला भेटतील असं आश्वासन दिल्याचे चुक्कल यांनी सांगितले. (Raj Thackeray will visit soon at Taliye Village.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahad Landslide: 50 to 55 lives would have been saved in Taliye village; Serious allegations of locals in front of MNS leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app