एलटीटी - हातिया एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 10:53 IST2019-02-17T10:52:56+5:302019-02-17T10:53:24+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हातिया ही सुपरफास्ट एक्स्प्रेस रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर आली असता ही बाब निदर्शनास आली.

एलटीटी - हातिया एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली
जळगाव : लोकमान्य टिळक टर्मिनस ते हातिया या सुपरफास्ट एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना आज टळली. भुसावळ रेल्वे स्थानकावर ही ट्रेन आली असता एसी बोगीच्या चाकाची स्प्रिंग तुटल्याचे लक्षात आल्याने या जागी स्लीपर बोगी बदलण्यात आली.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हातिया ही सुपरफास्ट एक्स्प्रेस रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर आली असता ही बाब निदर्शनास आली. भुसावल रेल्वे स्थानकावर ही रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली. यावेळी थ्री- टायर एसी बोगी बी- २ चा बोल्ट (चाकाजवळील स्प्रिंग) तुटल्याचे लक्षात आले.
यामुळे एसी बोगी काढून त्याजागी स्लिपर को लावण्यात आला आणि गाडी पुढे रवाना करण्यात आली.