शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोटांगणाची जत्रा! दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर, सोनूर्लीचा जत्रोत्सव ठरतोय आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 14:21 IST

दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवांना त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवांना त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे. आता आगामी तिन महिन्यात गावोगावी ग्रामदेवतांचे उत्सव भावनिक आणि अध्यात्मिक वातावरणात साजरे केले जाणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावचा माऊलीचा जत्रोत्सव रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.नवसाला पावणाऱ्या देवी माऊलीची ख्याती जगभर पसरली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी दर्शनाला आणि लोटांगण घालून नवस फेडायला भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावतात. सकाळपासून भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी गर्दी करतात. दिवसभर हा कार्यक्रम चालतो.अशी घालतात लोटांगणेज्या भाविक भक्तांचे नवस पूर्ण होतात त्यांना जत्रोत्सवाच्या दिवशी कडक उपवास धरायचा असतो. रात्री साधारणपणे ११.३० नंतर मंदिराच्या समोरील पायरीपासून पुरुषांच्या उघड्या अंगाने लोटांगणाला सुरुवात होते. संपूर्ण मंदिराच्या सभोवताली फिरून पुन्हा त्याच पायरीकडे आल्यावर लोटांगण पूर्ण होते. त्यानंतर मंदिराच्या नजिकच्या विहिरीवर स्नान करून नारळाच्या शहाळ्याचे पाणी पिऊन उपवास सोडला जातो आणि लोटांगणाचा नवस फेडला जातो.महिलाही नवस फेडतात-पुरुषांप्रमाणे महिलाही नवस फेडतात. महिला मंदिराच्या भोवताली उभ्याने केस सोडून फेरी मारत लोटांगण पूर्ण करून नवस फेडतात. यासाठी महिलांची मोठी गर्दी असते. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.ग्रामस्थांचे सुयोग्य नियोजन-या जत्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक सोनूर्ली गावात येतात. यासाठी ग्रामस्थ, देवस्थान कमिटीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, एस.टी, पोलीस हे अगोदर बैठका घेऊन नियोजन करतात. लोटांगणाच्यावेळी रात्री ११ नंतर प्रचंड गर्दी उसळते. मात्र सुयोग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणFairजत्रा