शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बँक ऑफ महाराष्ट्रचा तोटा पावणेचार हजार कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 11:56 AM

गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने २ लाख ३ हजार ११७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. बड्या कंपन्यांची कर्जे थकीत असल्याने बँकेने हाऊसिंग, वाहन, शिक्षण अशा किरकोळ क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देबुडीत कर्जांमुळे तोटा वाढला : कॉर्पोरेट, कृषी विभागाचा एनपीए अधिकबँकेने आर्थिक वर्षांत १८,८०५ कोटी रुपयांची कर्जे किरकोळ क्षेत्रात केली वितरीत थकीत कर्जामुळे झालेला तोटा, कर्मचाऱ्यांची वेतन पुनर्रचना अशा विविध कारणांमुळे तोट्यात मोठी वाढ

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या एकूण अनुत्पादक खात्यांमधे (एनपीए) गेल्या आर्थिक वर्षांत ३,१०९ कोटी रुपयांची घट झाली असून, एनपीए १५,३२४ कोटी रुपयांपर्यंत खाला आला आहे. यातील निम्म्याहून अधिक अनुत्पादक खाती ही बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची आहेत. खालोखाल कृषी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा क्रमांक लागतो. मात्र, दुसरीकडे बँकेच्या तोट्यामध्ये मात्र, तब्बल पावणेचार हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी सोमवारी बँकेचा आर्थिक तांळेबंद सादर केला. बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत, हेमंत टम्टा या वेळी उपस्थित होते. गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने २ लाख ३ हजार ११७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. बड्या कंपन्यांची कर्जे थकीत असल्याने बँकेने हाऊसिंग, वाहन, शिक्षण अशा किरकोळ क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. बँकेने आर्थिक वर्षांत १८,८०५ कोटी रुपयांची कर्जे किरकोळ क्षेत्रात वितरीत केली. यात तब्बल १३.६५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एनपीएचा डोंगर ही बँकेसमोरील मोठी समस्या आहे. आर्थिक वर्षे २०१८मध्ये बँकेच्या एनपीएचे प्रमाण १८,४३३ कोटी (१९.४८ टक्के) रुपये होते. त्यात १५,३२४ (१६.४० टक्के) कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. पैकी मोठ्या कंपन्यांचे थकीत कर्जाचे प्रमाण तब्बल ९३१७ कोटी रुपये आहे. बँकेच्या नक्त तोट्यातील वाढ चिंताजनक आहे. बँकेला २०१८च्या आर्थिक वर्षांत ११४५.६५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यात ४ हजार ८५६ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. थकीत कर्जामुळे झालेला तोटा, कर्मचाऱ्यांची वेतन पुनर्रचना अशा विविध कारणांमुळे तोट्यात मोठी वाढ झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. -------------------------------

मार्च २०१९ अखेरीस विभागनिहाय कर्जाचे प्रमाण (रक्कम कोटींत)क्षेत्र                              दिलेली कर्जे        एनपीए        टक्केकृषी                               १५,१२०            २९१४        १९.२७किरकोळ क्षेत्र                १८,३१७            ६६३        ३.६२लघु-मध्यम उद्योग      १३,७२७            २३०१        १६.७६बड्या कॉर्पोरेट कंपन्या    ४४,०२८            ९३१७        २१.१६------------------------

किरकोळ (रिटेल) क्षेत्रातील एनपीए     (रक्कम कोटींमध्ये)    क्षेत्र                    दिलेली कर्जे        एनपीए        टक्केगृह                       १२,०५२            ५२०        ४.४९शिक्षण              १,०८७                    ७४        ६.८४वाहन                १३१७                    ३७        २.८२------------कंपनी लवादाकडे १० हजार कोटींचे दावे प्रलंबितबँक ऑफ महाराष्ट्रच्या १०३ बड्या थकबाकीदार कंपन्यांचे तब्बल १० हजार ३९ कोटी रुपयांचे दावे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) प्रलंबित आहेत. तसेच, कर्ज प्रकरणांची पुनर्रचना करावी यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे देखील १२ प्रकरणे प्रलंबित असून, त्यांची रक्कम तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये आहे. 

टॅग्स :PuneपुणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र