लग्नासाठी प्रेमीयुगुलाची घरातच चोरी, गुजरातहून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 02:42 IST2017-06-26T02:42:03+5:302017-06-26T02:42:03+5:30

कुटुंबीयांचा लग्नासाठी विरोध असल्याने नीलेश गुप्ता आणि प्रिया जाधव या प्रेमीयुगुलाने लग्नासाठी घरातच चोरी केल्याची

Loopie's house stolen in marriage, both arrested from Gujarat | लग्नासाठी प्रेमीयुगुलाची घरातच चोरी, गुजरातहून दोघांना अटक

लग्नासाठी प्रेमीयुगुलाची घरातच चोरी, गुजरातहून दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुटुंबीयांचा लग्नासाठी विरोध असल्याने नीलेश गुप्ता आणि प्रिया जाधव या प्रेमीयुगुलाने लग्नासाठी घरातच चोरी केल्याची घटना चेंबूर परिसरात समोर आली आहे. टिळकनगर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करत, त्यांना गुजरात येथून अटक केली.
चेंबूरमधील पेस्तम सागर परिसरात राहणाऱ्या या दोघांचे एकमेकांसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, नीलेश बेरोजगार असल्याने, दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पळून जाण्यासाठी जवळ पैसे नसल्याने, नीलेशने स्वत:च्याच घरातील दागिने आणि काही रोख रक्कम जमा केल्यानंतर, प्रियाला घेऊन तो गुजरात येथे गेला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून दोघांना ताब्यात घेतले.

Web Title: Loopie's house stolen in marriage, both arrested from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.