शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ; १० महिने घरी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचेय !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 11:56 PM

पालघर जिल्ह्यातील ५वी ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून होणार सुरू 

शशिकांत ठाकूरकासा : पालघर जिल्ह्यातील ५वी ते ८वीचे वर्ग शासनाच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार २७ तारखेपासून सुरू होत आहेत. यामुळे गेले आठ-नऊ महिने घरीच राहून कंटाळलेले विद्यार्थी आनंदी झाले असून त्यांना शाळेला जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागली आहे. दरम्यान, शिक्षकांच्या कोरोना टेस्ट व वर्गांचे सॅनिटायझेशन आदी कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यासाठी सुमारे चार हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट होणार आहे.

शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू असून इयत्ता ५ वी ते ८वीची जिल्ह्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे. डहाणू ५५०, जव्हार २७०, मोखाडा १७७, पालघर ६०१, तलासरी २०५, वसई २७२, वाडा ३६० अशा एकूण ३३१७ शाळा असून, यामध्ये जिल्हा परिषद २१३१ तर व्यवस्थापनाच्या ११८६ शाळा आहेत.

शिक्षक संख्या डहाणू ६२९, जव्हार २०७, मोखाडा १६७, पालघर २८८, तलासरी २३१, वसई ४३६, विक्रमगड २४०, वाडा २७९ असे एकूण २४७७ शिक्षक आहेत. तर प्राथमिक (पहिली ते पाचवी) वर्गाला अध्यपन करणाऱ्या शिक्षकांची संख्या १५८३ आहे.

विद्यार्थी संख्या डहाणू २२९४४, जव्हार ५६०४, मोखाडा ५४०९, पालघर १०,१५६, तलासरी ९५८८, वसई १६६३८, विक्रमगड ७६४३, वाडा ८६०४ अशी एकूण ८६,५८६ आहे.

मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ 

८-९ महिने घरीच राहून अनेक विद्यार्थी कंटाळले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागलेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सुरू होण्याची वाट पाहात होते.शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे.

८ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते, मात्र शाळा सुरू झाल्याने प्रत्यक्षात अध्यापन होणार असल्याने काही कठीण भाग शिक्षकांकडून समजावून घेता येईल. - श्रेयस ठाकूर, इयत्ता ६ वी

शाळा सुरू होत असल्याने आम्हाला प्रत्यक्षात शिक्षण घेता येईल व शिक्षक आणि मित्रांना भेटायला मिळेल. या सगळ्याचा आम्हाला आनंद आहे. - राज पाटील, इयत्ता ७ वी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या