शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:08 IST

Loksabha Election - पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली असा घणाघात ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर केला. 

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार हवेत, लोकसभेत कायदा बनवला तर कोर्ट काय करणार, त्यामुळे आता जनतेनं अबकी बार तडीपार असा नारा दिला आहे. अयोग्य ते काढा, इंडिया आघाडीनं एक एक पाऊल ठरवली आहे. हुकुमशाहीला हरवावेच लागेल नाहीतर देशाचे भवितव्य अंधारात येईल. त्याकाळी परकियांची गुलामगिरी होती, आता स्व‍कीयांची येईल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी दिली होती. आता स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी टिकवणारच ही आजची घोषणा असली पाहिजे असा घणाघात करत सत्तेच आल्यानंतर कुठल्या ५ गोष्टी करणार यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आपल्याला परत आणावेच लागतील. आर्थिक केंद्र परत आणायचं, मी मुख्यमंत्री असताना २ लाख कर्ज माफी दिली होती. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन हमीभाव मिळाला पाहिजे. माझ्या काळात हमीभाव मिळत होता मग आता का नाही. GST च्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद थांबवला पाहिजे. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. ती थांबवणार, शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे यासारख्या सगळ्या गोष्टीवरील जीएसटी मला काढायचा आहे. शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. मार्केट उपलब्ध करून द्यायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने करायची आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, युवकांना रोजगार द्यायचा आहे. महाराष्ट्राचं वैभव परत आणायचं आहे. महाराष्ट्र हे चित्र बदलू शकतात. राज्याने महाविकास आघाडीचे ४८ खासदार दिले तर सरकार बदलेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली. मणिपूर १ वर्ष घुमसतंय ते थांबवले का नाही. मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. ज्या महिलांची धिंड काढली गेली. तरीही इतकी दडपशाही, बातम्याही बाहेर येऊ देत नाही. अत्याचार आजही सुरू आहे. अजूनही मणिपूर अशांत आहे त्याबद्दल कुणात संवेदना नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, तुम्हाला लोकांची पोट भरली म्हणजे गुलाम केल्यासारखे आहे. तुम्हाला रोज खायचे असेल तर माझ्या दारासमोर भीक मागावीच लागेल. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचे. त्यानंतर तुमची माझ्याविरोधात बोलण्याची बिशाद काय अशी अवस्था सरकारने करून ठेवलीय. मोदींना देशाला दिशा आणि कार्यक्रम देता आला नाही असा आरोप ठाकरेंनी केला. 

दरम्यान, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती तिला तुम्ही नकली म्हणता आणि नकलींना मांडीवर घेतलं आहे. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा अशी अवस्था आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणं यालाच हुकुमशाही म्हणतात. लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करताना त्यांना जेलमध्ये टाकले. हेमंत सोरेनसारख्या आदिवासी नेत्याने भाजपाने धोबीपछाड केले. त्यांना तुम्ही हरवू शकत नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाचं स्थान देतायेत. प्रज्ज्वल रेवन्नावर बलात्काराचे आरोप तो पळून जातो, तुम्ही माझ्या शिवसैनिकांना जेलमध्ये टाकता. संजय राऊतांचा गुन्हा नसताना त्यांना तुरुंगात टाकता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धुतराष्ट्र नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...म्हणून यांना संविधान बदलायचंय

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांनी देशाचं संविधान निर्माण केले. ज्या बाबासाहेबांना त्यावेळी गोष्टी भेडसावत होत्या. त्यांच्याविरोधात बाबासाहेबांनी लढा दिला. बुरसटलेल्या गोमूत्रधारींना माझ्यापेक्षा बुद्धीमान माणूस हा कसा, वर्णद्वेष हा प्राचीन काळापासून सुरू आहे. दलित कुटुंबात जन्मलेला माणूस इतका बुद्धीमान कसा असू शकतो. त्याला दैवत, महामानव मानतात. त्यांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे, हा आमचा अपमान हे त्यांना वाटतंय, त्यामुळे या लोकांना संविधान बदलायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४