शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:48 IST

राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील अशी दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण नुकतेच राज यांनी दिल्लीला जात अमित शाह यांची भेट घेतली होती.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर या चर्चांना बळ आले. राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर निश्चित फायदा होईल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

पत्रकारांनी मनसेच्या महायुतीतील सहभागावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा सुरू आहे. अंतिम काय चर्चा झाली हे माहिती नाही. आणखी एक बैठक होणार आहे असं माध्यमांमधून कळतंय. शेवटी कुठल्याही युतीत जर कुणी आले तर बेरीजच होत असते. त्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे राज ठाकरे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे असं त्यांनी सांगितले. 

लोकशाहीत प्रत्येकाला टीकेचा अधिकार

लोकशाहीत कुणाला निवडणूक लढवायची हे प्रत्येकाला अधिकार आहे. आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यामुळे त्या नेत्याचे ऐकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असता तेव्हा प्रत्येकाने तुमचा उदोउदो केला पाहिजे असं काही कारण नाही. त्यामुळे शिवतारेंच्या मनात आले ते बोलले असं प्रत्युत्तर अजित पवारांनी विजय शिवतारे यांच्या टीकेवर दिले. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करू राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या जाहिरातीत हे न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याची सूचना केली. त्यावर सुप्रीम कोर्ट आपल्या देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करणं हे घटनेने आपल्याला सांगितले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूचनेचे पालन करण्यात येईल. लोकसभा निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवा असंही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे असं अजितदादांनी सांगितले. दरम्यान, महायुतीची आज बैठक होणार होती. त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा होईल. पुढील २ दिवसात बैठकीची तारीख ठरवू असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, बारामतीत पार्थ पवार प्रचारात दिसत नाहीत असं पत्रकारांनी विचारलं असता,  पार्थ पवार गुप्तपणे प्रचार करतायेत. गनिमी काव्याने प्रचार करतायेत अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी माध्यमांसमोर केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४