शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

या, मनातलं बोलूया; आता रोज भेटूया!... Lokmat Sakhi वेबसाईट लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 7:37 PM

Lokmat Sakhi : फॅशन-स्टाइल्स यासह स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात स्टायलिंगचे एलिगंट रुप शोधण्यापर्यंत आणि मानसिक, शारीरिक आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्याचा हात धरेपर्यंतचा प्रवास म्हणजे हा ‘लोकमत सखी’चा नवा प्लॅटफॉर्म आहे.

रोजच्या जगण्यातले प्रश्न सोडवणाऱ्या, साध्या-सोप्या आनंदाच्या युक्त्या सांगणाऱ्या, स्वयंपाकातली रहस्यं आणि आहार-विहाराचे प्रश्न सोपे करणाऱ्या एका रसरशीत प्रवासाला आपण निघूया सोबत... आता रोज!

लोकमत वृत्तपत्र समूहाने खास महिलांसाठी तयार केली रोज भेटायची नवी डिजिटल जागा :www.lokmatsakhi.com

तुमच्या मोबाईलमध्ये भेटणारी, नेहमी तुमच्या सोबत असणारी जीवाभावाची मैत्रीण!

या साइटवर असं नवीन काय आहे?

तेच जे एरव्ही बायकांच्या जगण्यात असतंच, जगण्याचं वेगवान झपाटलेपण. भरभरुन जगण्याची आस, आनंद वाटून घेत तो साजरा करण्याची उर्मी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याची धमक आणि स्वत:सह मुलांसह कुटुंबाला घडवण्याची खमकी हिंमत.

या साऱ्यात काही निवांत क्षण मात्र हरवतात. जगण्याचं मऊ अस्तर विरतं, कधी फाटतं, कधीतर पुरतं निघूनही जातं हातून आणि ते लक्षातही येत नाही, इतका कोरडा रखरखाट जगणं व्यापून टाकतो.

तो प्रॅक्टिकल कोरडेपणा, टू डूच्या अंत पाहणाऱ्या याद्या, स्पर्धेत धावण्याची अटळ सक्ती हे सारं नव्या जगण्याचा भाग असलं तरीचांदण्या रात्री निवांत बसावं गझल ऐकत असे क्षण आपले आपण शोधले पाहिजेत, नव्हे जगलेही पाहिजेत. ते कसे शोधायचे, ‘फिलिंग अमूकतमूक’च्या सोशल मीडिया पीडीए आणि शो-शा पलीकडे जगण्यात खरे आनंदाचे रंग कसे भरायचे, वाटलं माराव्या निवांत गप्पा, जरा मनासारखं रांधून खावं, खाण्यापिण्यापासून ते खाण्यापिण्याच्या आठवणीपर्यंत पदार्थांच्या रंगागंधापर्यंत, फॅशन-स्टाइल्स यासह स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात स्टायलिंगचे एलिगंट रुप शोधण्यापर्यंत आणि मानसिक, शारीरिक आरोग्यापासून आर्थिक स्वातंत्र्याचा हात धरेपर्यंतचा प्रवास म्हणजे हा ‘लोकमत सखी’चा नवा प्लॅटफॉर्म आहे.

मैत्रिणींचा हक्काचा कट्टा असावा, मन मोकळं करण्याची, मिळून काही जगण्याची, साजरं करण्याची जागा म्हणजे www.lokmatsakhi.comसौंदर्य, आहारविहार, फॅशन, मेकअप ते आरोग्य, मानसिक आरोग्य, आर्थिक गुंतवणूक, लैंगिक प्रश्न आणि नाती या साऱ्या विषयांसह मोकळेपणानं लिहिण्या-बोलण्या-वाचण्याची हक्काची जागा.

तर मग आता भेटू रोजच..

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाLokmatलोकमत