शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

LMOTY 2019: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं 'हाऊ इज द जोश?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 9:23 PM

युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर उद्धव यांना उरी स्टाईलमध्ये उपस्थितांना हाऊ इज द जोश असा प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित होते. यावेळी मंचावर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावर बोलताना मंचावर आज घराणेशाहीचे शिलेदार उपस्थित असल्याचं उद्धव म्हणाले.'आज इथे बरीच घराणी उपस्थित आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी इथं आहेत. नानासाहेबांकडून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. तो वारसा ते अतिशय उत्तमपणे पुढे नेत आहेत. धर्माधिकारी कुटुंबानं ओसाड माळरानात जीव ओतला. लाखो घरांचं घरपण जपण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांचं कार्य पाहिल्यावर आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. आम्ही मतांसाठी घरोघरी जातो. मात्र ते सामाजिक भावनेतून घरोघरी जातात. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून आज मला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नाही, तर आशीर्वाद आहे, असं मी मानतो,' अशा भावना उद्धव यांनी यावेळी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरेंनी यावेळी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरदेखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. गेल्या आठवड्यात झालेल्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचं दु:ख आपल्या सर्वांच्या मनात आहे. आता या हल्ल्याचा कशा प्रकारे बदला घेतला जातो, याची वाट देशवासीय पाहत आहेत. पाकिस्तान हा सुधारणारा नाही. त्यामुळे पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. एनएससीआय डोम येथे आयोजित लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पॉवर आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी व्यक्त केली.  

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाUri MovieउरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस