शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

LMOTY 2019: डॉ. राजेश देशमुख यांचा प्रॉमिसिंग आयएएस ऑफिसर म्हणून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 7:35 PM

 सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारीपद भूषवत असलेले आयएएस अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट आयएएस ऑफिसर म्हणून सन्मानित करण्यात आले.

मुंबई  -  सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारीपद भूषवत असलेले आयएएस अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट आयएएस ऑफिसर म्हणून सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या भरीव आणि नेत्रदीपक कामगिरीमुळे यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्काराने देशमुख यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'कॉटन सिटी' अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कॅपीटल अशी ओळख झाली. मात्र शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्यामुळे २०१८ या एका वर्षात या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा तब्बल १२९ नी कमी झाला आणि डॉ. राजेश देशमुख हे नाव राज्यभर झाले होते. एसबीआयने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास विलंब केला होता. वारंवार सांगूनही बँका कर्जपुरवठा करत नव्हत्या. आपल्या बँकेतली शासनाची सगळी खाती बंद करुन दुसऱ्या बँकेत शिफ्ट केली जातील असेही सांगून पाहिले पण एसबीआय सारखी बँक दाद देत नव्हती. तेव्हा देशमुख यांनी एसबीआयमधील १७ खाती बंद केली व २०० कोटी रुपये अन्य बँकांमध्ये वळवले. राज्यातला हा असा पहिला धाडसी निर्णय होता. मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले. परिणामी बँकेचे मुंबई व दिल्लीतील अनेक वरिष्ठ अधिकारी यवतमाळला आले आणि कर्जपुरवठ्यात दुप्पट वाढ झाली.

हे होते परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर हे परीक्षक मंडळ होतं. 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Maharashtraमहाराष्ट्र