‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे आज टीव्हीवर प्रक्षेपण
By Admin | Updated: October 1, 2016 04:01 IST2016-10-01T04:01:53+5:302016-10-01T04:01:53+5:30
राज्यातील पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाच्या दिशांचा वेध घेण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे आज टीव्हीवर प्रक्षेपण
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाच्या दिशांचा वेध घेण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्याचे प्रक्षेपण शनिवार १ आॅक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता डीडी सह्याद्री वाहिनीवरून होणार आहे. तसेच ‘सीएनबीसी टीव्ही १८’ या वाहिनीवरून दोन भागांत याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पहिला भाग शनिवारी दुपारी दोन वाजता तर दुसरा भाग रविवार २ आॅक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता दाखविण्यात येणार आहे.
मुंबईतील ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाली होती.
‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर : बंदरे आणि जहाज वाहतूक, एमएसआरडीसी : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे, एमएमआरडीए : एमटीएचएल, मेट्रो-७ तसेच एमआयडीसी : मॅग्नेटिक महाराष्ट्र, डीएमआयसी आणि सिडको : नैना सिटी, मेट्रो आणि राज्य सरकारचे अन्य नवीन प्रकल्प यांबाबत मान्यवरांनी सविस्तर सादरीकरण केले. या वेळी झालेल्या विचारमंथनातून एकप्रकारे देशातील भावी विकासाची दिशाच निश्चित करण्यात आली. (प्रतिनिधी)