शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकायुक्त कायदा सक्षम करणार

By admin | Updated: November 3, 2014 00:49 IST

भ्रष्टाचार विरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकायुक्त कायद्यात बदल करून तो अधिक सक्षम करणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.

मुख्यमंत्र्यांची नागपुरात घोषणा : मिहानला प्राधान्यनागपूर : भ्रष्टाचार विरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकायुक्त कायद्यात बदल करून तो अधिक सक्षम करणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. मतदारांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत त्यामुळे जनतेच्या ऋणात राहणेच मला मान्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नगरागमन झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे आज शहरात दणदणीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापुढील त्रिकोणी मैदानात आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. विद्यमान कायद्यानुसार लोकायुक्तांना विशेष अधिकार नाही, त्यामुळे ते भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करू शकत नाही. अधिकारात वाढ करा, अशी मागणी लोकायुक्तांनी यापूर्वीच्या सरकारकडे केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्ही लोकायुक्तांच्या कायद्यात बदल करू व लोकायुक्तांना अधिक अधिकार देऊ. त्यामुळे लोकायुक्तांना भ्रष्टाचाराविरुद्ध ठोसपणे कारवाई करता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, कृष्णा खोपडे, नागो. गाणार, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सुधाकरराव देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, प्रमोद पेंडके मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छापर आशीर्वाद दिले. देवेंद्र यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास नक्की होईल, याची खात्री वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मिहानला आता कुणीच रोखू शकत नाहीगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिहान प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले. या प्रकल्पाच्या राज्य सरकारशी काही समस्या असतील तर त्या तातडीने सोडविल्या जातील आणि केंद्र सरकारच्या संबंधित काही प्रश्न असतील तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने सोडविले जाईल. संपूर्ण विदर्भाचा चेहरामोहरा बदलविण्याची क्षमता असणाऱ्या मिहान प्रकल्पाचा विकास आता कुणीही थांबवू शकणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात सोमवारी तातडीने बैठक बोलाविली असून त्यात सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मिहानबाबत त्वरित निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. हे देवेंद्रचे नव्हे ‘लोकांचे सरकार’हे सरकार माझे किवा भारतीय जनता पक्षाचे नाही तर ते जनतेचे सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले. माझ्यावर खूप अपेक्षांचे ओझे आहे आणि त्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी मी स्वत:ला झोकून देईन. लोकांच्या विश्वासामुळेच मी या पदावर पोहोचू शकलो. लोकांच्या विश्वासाला ठेच पोहोचेल अशी कुठलीही कृती माझ्या हातून घडणार नाही. जनतेला मान खाली घालावी लागेल असे कुठलेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मला मोहित करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी भेटलो, तेव्हा त्यांनी ‘सरकार वाचविण्यासाठी चालवू नका. तुम्ही काम करा. सरकार जनताच वाचवेल’ असे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनात मी जनतेचेच काम करीत राहीन. टष्ट्वेण्टी-२० मध्ये प्रत्येक बॉल आणि ओव्हर महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानून मी जनतेचे प्रश्न सोडविणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.