शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला लंकेंकडून पराभूत, सुजय विखे विधानसभेसाठी संगमनेर, राहुरीतून इच्छुक

By अण्णा नवथर | Updated: August 1, 2024 12:39 IST

ज्‍या तालुक्‍यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल, अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार - विखे

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मला आता वेळ आहे ,संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्‍या तालुक्‍यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल, अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्‍याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना केले.

       डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्‍या दौ-यांबाबत काही गोष्‍टी स्‍पष्‍ट  केल्‍या. या मतदार संघातून मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून, आमच्‍या कुटूंबाच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा सर्वपरी तेच आहेत. त्‍यामुळे मी शिर्डी मधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्‍फळ आहे. सर्वांना उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आमदार राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

       विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य यांनी केले.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा