शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 09:28 IST

Loksabha Election - उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली असताना त्यावर आता मनसेनेही जशास तसं उत्तर दिलं आहे.

मुंबई - Prakash Mahajan on Sushma Andhare ( Marathi News ) आधी दलित चळवळीची सुपारी घेतली, त्यानंतर राष्ट्रवादीची सुपारी घेतली. त्यानंतर आता उबाठाची सुपारी घेतली. घे बोकांडी कर दहिहंडी असं बोलणाऱ्या याच सुषमा अंधारे आहेत. प्रभू श्री रामांबाबत, हनुमानाबाबत, संत ज्ञानेश्वर, एकनाथ महाराजांबाबत वाट्टेल त्या पातळीवर अंधारेंनीच भाषा केली असा घणाघात करत होय आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाची, महाराष्ट्राच्या हिताची असा पलटवार मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारेंवर केला आहे. 

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गुरुशिक्षाचे नाते होते. कोकण दौऱ्यावर राज ठाकरे निघाले असताना बाळासाहेबांनी राज यांना फोन केला, उद्धवला रुग्णालयात दाखल केलंय. तशीच गाडी राज यांनी फिरवली आणि माघारी मुंबईला गेले. उद्धव ठाकरेंवर पूर्ण उपचार होईपर्यंत तिथे थांबले, त्यानंतर रुग्णालयातून घरी जात मातोश्रीला सोडले हे सुषमा अंधारेंना माहिती आहे का? मुंबईत महापूर आला तेव्हा बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडलं होते. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी बाळासाहेबांना सुखरुप कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आणलं होते. तेव्हा हे लोक पंचतारांकित हॉटेलला जाऊन राहिले होते. ज्या लोकांना हे माहिती नाही ते उठसूठ टिका करायची आणि टाळ्या मिळवायच्या ही अशी भाषा केली जाते. वाईट म्हणजे उबाठा ही अंधारेंची म्हणून खेडेगावात ओळखली जाते हे उद्धव ठाकरेंनी कमावलं आहे. ही आमची अवस्था झाली नाही असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच सुषमा अंधारे या प्रोफेशनल पॉलिटिक्स करणाऱ्या आहेत. सुपारी घेऊन उबाठा गटाचं बीड जिल्हाप्रमुखपद कुणाला दिले हे लोकांना माहिती आहे. बीड जिल्ह्यात सुपारी घेऊन टिका करणारी कोण हे सगळ्यांना माहिती आहे. घे भरारीच्या सभेतच मी यांच्यावर बोललो होतो. या बाई कित्येकदा बोलताना घसरल्यात, मात्र माध्यमे काही बोलत नाही. राष्ट्रवादीत, उबाठात भाषणं करताना जीभ घसरली तरी माध्यमे काही बोलत नाहीत. सुपारी घेऊन यांनी पॉस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या माणसाला पद दिले, यांच्या थोबाडीत त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने मारली. आमच्या नेत्याने टीका केली, त्यामुळे या बाई कांगावाखोर असल्याचं दाखवून देतायेत असंही प्रकाश महाजनांनी म्हटलं. 

दरम्यान, राज ठाकरे राजकीय फायद्यासाठी आरोप करत नाहीत. राम मंदिर, कलम ३७० बाबत मोदींनी जे केले त्याचं खुल्या मनाने राज ठाकरेंनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींमुळे भारताची प्रतिष्ठा आणि मान वाढवली हे नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या भूमिका पटल्या नाहीत त्यावर राज ठाकरेंनी विरोध केला. ज्या पटल्या त्याचे कौतुकही केले असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेSupriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे