शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:59 IST

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सत्ता जाणार, असा दावा सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल आल्यापासून काँग्रेससह इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे नेते त्यावर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटानेही एक्झिट पोलवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, असा दावा सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. 

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधी टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील, हे सुद्धा त्यांनी सांगूव टाकले आहे. काही राज्यातील मतदानाची पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे या राज्यात निकाल काय लागेल, याचं भविष्य कुणीच सांगू शकत नाही. मात्र सगळ्या मतदानाची सारासार माहिती न घेता एक्झिट पोलवाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी पुन्हा एकदा मोदीच येत आहेत आणि भाजपाला आणि त्यांच्या आघाडीस ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे बिनधास्त ठोकून दिले. भाजपाला ३५० जागा मिळाव्यात असे कोणते महान कार्य असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवलं आहे, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. ४ जून रोजी मतमोजणी होईल आणि हुकूमशाहूचा अंध:कार दूर होईल. मोदींनी ध्यान केले आणि सूर्याला शांत केले, असे भाजपाला शांत केले, असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेचा उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाही.  त्यामुळे भाजपाचा पराभव होणारच आहे. भाजपा २२५ च्या वर जात नाही. तर इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल हे गुवाहाटीमध्ये कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय १०० टक्के मुमकीन है, मोदी जात आहेत, हाच ४ जूनचा खरा निकाल आहे, असा दावाही सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे