शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 09:40 IST

Loksabha Election - राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेला खडे बोल सुनावले असून भाजपावरही निशाणा साधला आहे.

मुंबई - Aaditya Thackeray on MNS ( Marathi News ) देरासरबाहेर मांसाहार टांगून मनसेच्या लोकांनी आंदोलन केले होते, तीच मनसे आज भाजपासोबत आहे त्यामुळे जैनसमाज भाजपासोबत राहणार का?, ज्या मनसेनं उत्तर भारतीयांना मारहाण केली त्या मनसेचा पाठिंबा भाजपाला चालतो का असा सवाल करत उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे-भाजपावर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं की, मी मनसेच्या नेत्यांवर कधी बोलत नाही. ते पथ्य मी पाळतो. पण मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो, तुम्ही जो भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या शिंदे गटाला दिलाय, त्याच्यात गुजराती सोसायटीबाबत जी घटना घडली, गुजरात आणि गुजराती लोकांसोबत आमचे भांडण नाही. पण इथून उद्योग उचलून तिकडे नेले जातात तेव्हा मी नडणार नाहीतर ते सर्व आमचेच आहेत. मराठी माणसाला नोकरी नाकारली, सगळे उद्योग धंदे जे गुजरातला चाललेत त्याला बिनशर्त पाठिंबा आहे का? असं त्यांनी विचारले, झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याचसोबत ज्या उत्तर भारतीयांना मनसेने एकदा नव्हे तर अनेकवेळा मारलं आहे मग त्यांचा पाठिंबा घ्यायला भाजपा तयार आहात? तसेच जर भाजपा जिंकली तर उद्योगधंदे गुजरातला जाणार, इथल्या भूमिपुत्रांना नोकरी मिळणार नाही यालाही मनसेचा पाठिंबा आहे का? असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच कोकणच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. उबाठा गटाकडून वारंवार उद्योगधंदे गुजरातला पळवले जातायेत असं म्हटलं जातं, परंतु २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर २०१९ ते २०२२ या मागील १० वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे साडे सात वर्ष सत्तेत होते. तेव्हा उद्योगधंदे बाहेर जातायेत ते का अडवले नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMNSमनसेBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४