शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण

By यदू जोशी | Updated: March 23, 2024 05:51 IST

पाॅलिटिकल वाॅर: मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला आहे.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे, महाविकास आघाडीतही तणाव आहे. मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला आहे. माढामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊनही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध सुरूच ठेवला आहे. बारामतीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (शिवसेना) आणि हर्षवर्धन पाटील (भाजप) हे सुनेत्रा पवार यांना विरोध करण्याची चिन्हे असल्याने अजित पवारांचा ताप वाढला आहे.

काँग्रेससाठी चंद्रपूरची उमेदवारी ही डोकेदुखी बनली आहे. विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर असा पेच तेथे आहे. दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे (शिंदे) राहुल शेवाळे उमेदवार असतील आणि त्यांना टक्कर द्यायची तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तिथे अनिल देसाईंच्या नावावर अडली आहे.

  • महायुतीत यावर मतभेद

- नाशिकची जागा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीलाही हवी.- रामटेक, कोल्हापूर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच.- धाराशिव, गडचिरोली, सातारावर भाजप अन् राष्ट्रवादीचाही दावा

 

  • मविआची चिंता

- रामटेक, दक्षिण-मध्य मुंबई, सांगली हे काँग्रेस व शिवसेनेला हवेत.- भिवंडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही दावा - जालनाच्या जागेसाठी शिवसेनेबरोबर काँग्रेसही आग्रही- मुंबईत काँग्रेसला किमान दोन जागा हव्यात.

  • ‘या’ जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली

- अमरावतीत नवनीत राणांना उमेदवारी देण्यास स्थानिक बहुतेक सर्व भाजप नेत्यांचा विरोध- माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीस रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी) आणि विजयसिंह मोहिते पाटील (भाजप) यांचा विरोध.- सोलापूरचा उमेदवार ठरविण्यात स्थानिक नेत्यांमध्ये मतैक्य नाही.- सातारामध्ये उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत मतदारसंघातील काही भाजप नेत्यांची नाराजी.

यवतमाळ-वाशिम, रामटेकसाठी दबावयवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांना विरोध करण्यासाठी भाजपचे दोन्ही जिल्ह्यातील नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जोर लावत आहेत. रामटेकची जागा आपल्याकडे घ्या, असा दबाव स्थानिक भाजप नेत्यांनी फडणवीसांवर आणला आहे. 

वंचितची शक्यता किंचित; चर्चा सुरूचॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. अजूनही आंबेडकर यांच्याशी अन्य तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करत आहेत. आंबेडकर रोज नवनव्या मागण्या करत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सफल होण्यात अडचणी येत आहेत, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस