शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'राज ठाकरे अन् मोदीविरोध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:35 IST

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे समर्थन करणारे राज ठाकरे सध्याचं मोदी सरकार उलथवण्यास आघाडीला मदत करून प्रायश्चित तर करत ना नाही, असा प्रश्न मनसे सैनिकांसह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

रवींद्र देशमुख

तब्बल १० वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बाजुला सारून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणात उतरवले. त्यावेळी गुजरात विकासाचे मॉडेल तळागाळात पोहचविण्यासाठी योग्य ती खबरदारीही घेण्यात आली. केवळ 'गोध्रा'मुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या मोदींची प्रतिमा शेवटच्या घटकापर्यंत विकासपुरुष म्हणून उदयास आणण्यासाठी संघ-भाजपने सोशल मीडियाचा यथासांग वापर केला. यासाठी अनेक नेत्यांचा आणि तत्कालीन विरोधकांचा हातभारच लागला. अर्थातच गुजरात विकासाचे मॉडेल गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत जगजाहीर झाला. परंतु, त्यासाठी बराच काळ जावा लागला हेही तेवढच खरं.

महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीच २०१४ मधील पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी यांची मराठी माणसाला चांगल्या प्रकारे ओळख करून दिली होती. आपल्या झंझावाती भाषणांमुळे महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय मीडियामध्ये राज ठाकरे यांच अढळ स्थान होतं. त्यांच हे स्थान आजही अबाधित आहे, यात शंका नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज ठाकरे यांनी गुजरातला भेट देऊन तेथील विकासाचे कौतुक केले होते. त्यावेळी एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या विकासाचे कौतुक करणे हे आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला भावले. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या 'मनसे'ने देखील लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच शिवसेनेविरुद्ध उमेदवार देण्याचे निश्चित केले. परंतु, याचवेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. त्या निवडणुकीत मनसेच्या वाट्याला अपयश आले, किंबहुना अनेक ठिकाणी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की मनसेवर ओढावली. तर महाराष्ट्रात कधी नव्हे असा भाजपचा विजय झाला.

दरम्यान सत्तेत आलेल्या मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटी यासारखे मोठमोठे निर्णय घेतले. परंतु, फसलेली नोटबंदी आणि वाढती बेरोजगारी यामुळे मोदी सरकारवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातच मोदींच्या समर्थनात सर्वप्रथम पुढे आलेल्या राज ठाकरे यांनी आपली मोदी विरोधी भूमिका स्पष्ट केली. तसेच सरकारच्या कारभारावर कडाडून टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर पदार्पण करून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच भाजप देशासाठी घातक असल्याचे सर्वप्रथम त्यांनी म्हटले.

राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नसून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मोदींना विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले. अर्थात मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेत विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यात काहीही वावगे नाही. मात्र मोदी सरकारविरुद्ध राज ठाकरे यांचा आक्रमक पावित्रा अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्यातच आता राज ठाकरे महाआघाडीच्या व्यासपीठावर जाणार असल्याचे समजते. त्यामुळे २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे हे मोदी सरकार उलथवण्यास मदत करून प्रायश्चित तर करत ना नाही, असा प्रश्न मनसे सैनिकांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMNSमनसे