शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'पंकजा ताई, शिकारी तगडा असला की, गुलेलने पण वाघिणीची शिकार होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 18:06 IST

मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या सर्वच मतदारसंघातील प्रचार शिंगेला पोहचला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात बहीण-भावांचे एकमेकांवर सुरू असलेल्या टीका थांबायच नाव घेत नाही. बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांपेक्षा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचीच जास्त चर्चा आहे.बीड लोकसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडेच्या यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंवर टीका केली होती. राष्ट्रवादी पक्षाला काही कळत नाही, वाघिणीची शिकार करायला गुलेलचा वापर करत नसतात असा टोला त्यांनी धनंजय मुंडेना लागवला होता. धनंजय मुंडेंनी याला उत्तर देत पंकजा मुंडे यांच्यावर तोफ डागली.

शिकारी जर निबार असेल तर गुलेलने पण वाघिणीची शिकार करता येते, असा पलटवार करत पंकजा मुंडेंचा समाचार घेतला. पंकजा मुंडेंना कसला गर्व आला आहे. दोन दिवसानंतर प्रचार संपणार पण अजून मला कळलेच नाही की उमेदवार मी आहे की बजरंग सोनवणे आहे. मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.

बीड लोकसभा मतदारसंघात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे रिंगणात आहे.मात्र खरी लढत मुंडे विरोधात मुंडे अशी बनली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडे