शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

भाजपाची 'कूssल' खेळी; बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचं पवार कुटुंबाशी खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 10:26 IST

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.  

ठळक मुद्देकांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. मुलगी लहान असल्याने सुरुवातीला कांचन कुल निवडणुकीसाठी तयार नव्हत्या.

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे लढत असलेल्या कांचन कुल  यांच्या सुनेत्रा पवार या सख्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार यांनीच 2005 मध्ये राहुल आणि कांचन यांचे लग्न जमविले होते.

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. याच घराण्यातील पदमसिंह पाटील हे दत्तक गेले आहेत. त्यामुळे नात्याने पाटील हेदेखील कांचन कुल यांचे चुलते आहेत. उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत असलेले राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. कुमारराजे हे वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच आणि सोमेशवर सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते.  कांचन कुल यांचे शिक्षण बारामतीतील शारदा नगर येथे झाले. त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली आहे.  2005 सली त्यांचा राहुल कुल यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार असलेल्या रंजना कुल यांचे चिरंजीव राहुल यांच्याशी विवाह जमविण्यात पवार यांनी पुढाकार घेतला होता.  राहुल यांचे वडील सुभाष कुल 1990 ते 2001 या काळात दौंडचे आमदार होते.  त्यांच्या अकाली निधनानंतर पत्नी रंजना कुल पोटनिवडणुकीत निवडून आल्या. 2004 च्या निवडणुकीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर पुन्हा आमदारकी मिळवली होती. 2009 साली राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. मात्र त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी राहुल यांचा पराभव केला.  2014 च्या निवडणुकीत राहुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून आमदारकीची निवडणूक लढविली. यामध्ये त्यांचा विजय झाला.

दौंड तालुक्यातील राजकारण हे राहुल आणि रमेश थोरात यांच्याभोवती केंद्रित आहे सुभाष कुल यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुल  यांच्या पालकत्वाची भूमिका स्वीकारली होती.  राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना कारखान्याला मदत करण्याचा विषय असो किंवा कुल थोरात गटात उमेदवारि देण्याचा निर्णय, पवार यांनी कुल यांची बाजू घेतली.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तसक्षम उमेदवाराचा शोध भाजपा कडून सुरू होता. सुरुवातीला माजी आमदार रंजना कुल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून  कांचन कुल यांनी  उमेदवारी घ्यावी यासाठी आग्रह होता. कांचन यांना नऊ वर्षाचा  मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. मुलगी लहान असल्याने सुरुवातीला त्या निवडणुकीसाठी तयार नव्हत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता सुप्रिया सुळे आणि कांचन कुल या बारामतीच्या लेकींची लढाई होणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा