शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Lockdown: लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर; उद्धव ठाकरे, अजित पवारांमध्ये सकाळी महत्वाची बैठक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 7:36 PM

CM Uddhav Thackeray meeting with Covid19 Task Force: कोरोनाची (Corona) लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या (Corona Task Force) सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची बैठक होणार असून यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी स्पष्ट केले आहे. (CM uddhav Thackreay, Dy CM Ajit Pawar will take descision on maharashtra Lockdown.)

कोरोनाची (Corona) लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या (Corona Task Force) बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले होते. 

आजच्या बैठकीत रेमडेसीवीर, ऑक्सिजनचा तुटवड्यासह राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा यावर चर्चा झाली. 

कालच्या बैठकीत काय झाले?काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis)  सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. राजेश टोपे यांनी उद्यापासून लगेचच लॉकडाऊन करण्यात येणार नाही, काही दिवसांचा वेळ देऊन ल़ॉकडाऊन केला जाईल, असे सांगितले आहे. यामुळे थोड्याच वेळात 8 दिवस की 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी लॉकडाऊन करण्याआधी तीन कामकाजी दिवसांचा वेळ द्यावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारRajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस