शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत लोकलचे पेपरलेस तिकीट

By admin | Updated: May 5, 2015 01:50 IST

प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आल्यानंतर आता यामध्येच बदल करून रेल्वेकडून पेपरलेस तिकीट सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई : प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आल्यानंतर आता यामध्येच बदल करून रेल्वेकडून पेपरलेस तिकीट सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोबाइल तिकीट सेवेत प्रिंट तिकीट ग्राह्य धरले जाते. मात्र यात बदल करतानाच मोबाइलमधील तिकीटच ग्राह्य धरण्यात येणार असून चेन्नईत त्यावर चाचणीही सुरू करण्यात आली आहे. ही सेवा आता येत्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेवर सुरू केली जाणार असल्याचे रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) अजय शुक्ला यांनी सांगितले. तिकिटांतील गैरप्रकार थांबविण्यासाठी मोबाइल तिकीट सेवा जीपीएस यंत्रणेशीही जोडण्यात येईल. यात प्रवाशांना स्टेशन परिसरात येण्यापूर्वीच तिकीट काढावे लागणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. गुगल प्ले आणि विंडोज स्टोअरमधून मोबाइल तिकीट सेवा डाऊनलोड करण्याची सोय आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव यात नोंदवावे लागते. त्यानंतर अनेक प्रक्रिया पार पडल्यानंतर स्थानकावर जाऊन युनिक बुकिंग आयडीद्वारे एटीव्हीएमवर तिकिटांची प्रिंट मिळते. मात्र यासाठी सगळी प्रक्रिया पार पाडतानाच पुन्हा एटीव्हीएमवर जाऊनच तिकीट घ्यावे लागत असल्याने त्याचा फारसा फायदा प्रवाशांना मिळत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) अजय शुक्ला यांनी सांगितले की, चेन्नईत मोबाइल तिकिटामध्ये विनाप्रिंट सेवा सुरू करण्याची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी होत असून, येत्या दोन महिन्यांत मुंबईतील लोकल प्रवाशांसाठीही पेपरलेस तिकीट सेवा सुरू करण्यात येणार आहे. विनाप्रिंट सेवेसाठी एक विशिष्ट मोबाइल अ‍ॅप तयार करण्यावरही काम केले जात असून जे जीपीएस यंत्रणेशी जोडलेले असेल, असे शुक्ला यांनी सांगितले. यात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाइलवर आलेल्या तिकिटांची माहिती किंवा त्याची पीडीएफ दुसऱ्याला ट्रान्सफरही करू शकणार नाही. यामध्ये जीपीएस यंत्रणेशी जोडण्यात येणार असल्याने अ‍ॅपमध्ये उपयोग केले जाणारे सॉफ्टवेअर स्टेशन परिसरातून बाहेर आल्यानंतर फाइलला करप्ट करेल. यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्यांदा करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.