Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:00 IST2025-12-01T05:58:25+5:302025-12-01T06:00:01+5:30
Maharashtra Local Body Elections: याचिकांमध्ये अडकलेल्या जागांसाठी आयोगाचा निर्णय : अंबरनाथसह २२ ठिकाणी संपूर्ण निवडणुका पुढे ढकलल्या; १३० जागांवरील मतदानही आता १८ दिवसांनी; २१ डिसेंबरला लागणार निकाल

Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
मुंबई : राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आता दुसरा टप्पा आला असून, काही ठिकाणी संपूर्ण नगरपालिका/नगरपंचायतींसाठी तर काही ठिकाणी प्रभागांचे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. २१ डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे.
ज्या नगरपालिका, नगरपंचायतींमधील सदस्यपदावरील उमेदवाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे, त्या प्रभागातील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली असून जिथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात याचिका दाखल आहे, तिथे संपूर्ण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती देऊन तिथे २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.
निवडणुकांमध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्या निवडणुका आता २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबरला होणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात, किती प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या?
जिल्हा व नगरपालिका/पंचायतींचा प्रभाग
पुणे (९ जागा) : दौंड - प्रभाग ९अ (१ जागा),
लोणावळा - ५ब, १०अ (२ जागा), तळेगाव = २अ, ७अ, ७ब, ८अ, ८ब, १०ब (६ जागा)
सातारा (३ जागा): कराड प्रभाग १५ब (१
जागा), मलकापूर - ४अ, ८अ (२ जागा)
सांगली (१ जागा) : शिराळा - प्रभाग ४
सोलापूर (३ जागा) : सांगोला : प्रभाग १ अ, ११अ (२ जागा), मोहोळ : ३अ (१ जागा)
यवतमाळ (६ जागा): दिग्रस प्रभाग २ब,
५ब, १०ब (३ जागा), पांढरकवडा ८ अ, ११ ब (२ जागा), वणी - १४ अ (१ जागा)
वाशिम (२ जागा) : रिसोड - ५ब, १०अ
गडचिरोली (४ जागा): गडचिरोली १ अ,
४ब, ११ ब (३ जागा), आरमोरी - प्रभाग १०
चंद्रपूर (४ जागा) : गडचांदूर - प्रभाग ८ब (१ जागा), मूल- १०ब (१ जागा), बल्लारपूर - ९अ (१जागा), वरोरा - ७ब (१ जागा)
गोंदिया (३ जागा) : गोंदिया-३ब, ११ब, १६अ
भंडारा (२ जागा): भंडारा - १५अ, १२अ
नागपूर (९ जागा) : कोंढाळी- प्रभाग ८, १६ (२ जागा), कामठी - १०अ, ११ब, १७ब
(३ जागा), रामटेक - ६अ (१ जागा), नरखेड - २ब, ५ब, ७अ (३ जागा)
वर्धा (७ जागा) : वर्धा - प्रभाग ९ब, १९ब (२जागा), हिंगणघाट - ५अ, ५ब, ९अ (३ जागा), पुलगाव - २अ, ५अ (२ जागा)
बुलढाणा (९ जागा): खामगाव प्रभाग
५अ, ७अ, ९ब, १६ब (४ जागा), शेगाव -४अ, ४ब (२ जागा), जळगाव जामोद -प्रभाग ६अ, ६ब, ७ब (३ जागा)
जळगाव (१२ जागा) : अमळनेर - १अ (१)
जागा), सावदा २ब, ४ब, १०ब (३ जागा), यावल ८ब (१ जागा), वरणगाव - १०अ, १०क (२ जागा), पाचोरा ११अ व १२ब (२ जागा), भुसावळ - ४ब, ५ब, ११ब (३ जागा)
नाशिक (७ जागा) : सिन्नर - प्रभाग २अ,
४अ, ५अ, १०ब (४ जागा), ओझर - १अ, ८ब (२ जागा), चांदवड प्रभाग ३ (१ जागा)
अहिल्यानगर (१२ जागा) : जामखेड -
प्रभाग २ब, ४ब (२ जागा), श्रीगोंदा - ७ब (१ जागा), राहुरी - २अ (१ जागा), संगमनेर -१ब, २ब, १५ब (३ जागा), श्रीरामपूर - ३अ (१ जागा), शेवगाव - १ब, ५अ, १२अ (३ जागा), शिर्डी : ६अ (१ जागा)
हिंगोली (२ जागा):
हिंगोली - ५ब, ११ब
परभणी (३ जागा) : जिंतूर - ११क
(१ जागा), पूर्णा : १ब, १०ब (२ जागा)
नांदेड (३ जागा): भोकर - प्रभाग १ब
(१ जागा), कुंडलवाडी - ३अ (१ जागा), लोहा - ५ब (१ जागा)
बीड (१० जागा) : धारुर - प्रभाग १०अ
(१ जागा), अंबाजोगाई - १ब, ३अ, ६अ, १०ब (४ जागा), परळी - ९अ, १४ब, ३अ आणि ब, ११ब (५ जागा)
धाराशिव (३ जागा) : धाराशिव - प्रभाग
२अ, ७ब, १४ब (३ जागा)
छत्रपती संभाजीनगर (८ जागा) : वैजापूर -
प्रभाग १अ, २ब (२ जागा), गंगापूर - ४ब, ६ब (२ जागा), पैठण - ३अ, ६ब, ६अ, ११ब (४ जागा)
ठाणे (७ जागा) : बदलापूर - प्रभाग ५, ८,
१०, १५, १७, १९ (६ जागा), वाडा - प्रभाग क्र.१२ (१ जागा)
पालघर (१ जागा) : पालघर पूर्व - प्रभाग १ब
कुठे संपूर्ण निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार?
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ.
या ठिकाणी निर्णय बाकी...
भंडारा : भंडारा नगरपालिकेत प्रभाग क्रमांक १५ अ आणि प्रभाग क्रमांक १२ अ या दोन ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
अद्याप निर्णय आलेला नाही.
बीड: बीड शहरातील प्रभाग ३ ब मध्ये मतदान प्रक्रिया राबवली जाईल की नाही याबाबत राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.