शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

LMOTY 2019 : महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान कधी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले असे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:13 PM

महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण...

मुंबई - महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण सध्या 2019 आणि 2014 साठी पंतप्रधानपद बूक झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोण पंतप्रधानपदी बसेल या प्रश्वावर आपण 2025 मध्ये चर्चा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज संपन्न झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुख याने घेतलेली मुलाखत  हे खास वैशिष्ट्य ठरले. यावेळी महाराष्ट्रातील माणसांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असा प्रश्न रितेश देशमुखने विचारला. रितेशचा हा प्रश्न सफाईदारपणे टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण सध्या 2019 आणि 2014 साठी पंतप्रधानपद बूक झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोण पंतप्रधानपदी बसेल या प्रश्वावर आपण 2025 मध्ये चर्चा करू.'' या उत्तरामधून मुख्यमंत्र्यांनी पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, युती कशी झाली याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे विचारणा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ''मातोश्रीवर आम्ही गेलो तेव्हा रश्मी वहिनींनी आम्हावा वडे आणि खिचडी खावू घातली. त्यामुळे आम्हाला चर्चेला मार्गच राहिला नाही आणि युतीचा प्रश्न मार्गी लागला.'' यावेळी चार वर्षे भांडल्यानंतर निवडणूक जवळ येताच तुमचे हसरे चेहरे दिसले. मला एवढेच विचारायचे आहे की 'तुम जो मुस्कूरा रहे हो.... क्या गम हे जिसको छिपा रहे रहे हो.'' अशी विचारणा रितेशने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ''जो बित गया सो बित गया, अब नई शुरुवात हो, असा विचार आम्ही केला. तशी आम्हाला एकत्र राहायची सवयच आहेच. सध्या देशात असंगाशी संग करणाऱ्या, एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्यांच्या आघाड्या होत आहेत. पण आम्ही एकमेकांचे चेहरे पाहिले आहेत. चांगल्या आणि वाईट काळातही आम्ही एकमेकांसोबत होतो.आमच्यामध्ये काही कारणांमुळे मतभेद झाले होते. मात्र आता ते मतभेद विसरून आम्ही व्यापक महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत.'' असेही मुख्यमंत्र्यांवी संगितले.''  

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र